सोमवार, २० फेब्रुवारी, २०१७

प्रार्थना शब्दांसाठी..

प्रार्थना ।। 
शब्दांसाठी। ।।

हे भगवंता ! 
मनातून उमळणाऱ्या ह्या शब्दांना इतकी माया, प्रेम दे, कि त्याने कधी कुणाचं मन दुखावलं जाऊ नये. 

आपलेपणाचा त्यांस इतका सुंगंधित सुवास दे, कि त्याने दुरावलेली नाती गॊती पुन्हा एकत्रित जुळू देतं.

शौर्याइतकचं प्रेरणादायी आग हि त्यात तळपू देत. जेणेकरून, ढासळलेल्या बुरज मनाला पुन्हा आभाळाकडं निर्भीड पण पाहता येईल.
आयुष्याची लढाई सहज अशी जिंकता येईल.

सौन्दर्याची हि इतकी अमाप रूपरेखाटनं जोडून दे, कि कोमजलेल्या कुठल्याही मनाला त्या शब्दसौन्दर्याची भुरळ पडून , तो आनंदाने दौडू लागेल.
नवं चैतन्याची अतरंगी शाल लपेटत.

वज्रासारखी प्रचंड अशी ताकद हि दे, जेणेकरून सर्व वाईट प्रवृत्तीच्या, हृदयी पाषाणा लाही , 
शब्दसख्यांचे, वज्रघाव बसून त्यातून मानवी
प्रेमाचा उमाळा ओघळू लागेल. 

आणि 
हे भगवंता !! 
सर्वात महत्वाचं, ह्या माझ्या मनाला हि अहंकारी परिघापासून, वलयापासून दूर ठेव.
इतकंच...
 
संकेत य पाटेकर
२१.०१.२०१७

शनिवार, १७ सप्टेंबर, २०१६

एवढंच मनाला सांगायचं....

रिमझिमणाऱ्या पावसाळा का बरं घाबरायंच ?
छत्री आहे नं संगीतनं, धो धो बरस, एवढंच आपण म्हणायचं...

दीड दमड्या ह्या समस्यांना का बरं भ्यायचं ?
दृढ विश्वास आहे नं संगीतनं, बिनधास्त यावं कधीहि , एवढंच आपण म्हणायचं..

रोजच्या जगण्यालाही ह्या का कंटाळायचं ? का उदासवाणि व्हायचं ?
जीवन सुंदर आहे. दृष्टिकोन फक्त बदल, एवढंच मनाला सांगायचं.... 

- संकेत 

ऐक सखे....

काही सांगायचे होते..
काही ऐकायचे होते..
काही जुन्या क्षणांना..
जरा गोंजरायचे होते..

क्षण हसवायचे होते..
जरा रुसवायचे होते..
मनं, नव्या क्षणांशी ..
जरा मिसळायचे होते..

भाव निरखायचे होते..
हृदयी जमवायचे होते..
मन तुझे आणि माझे..
जरा उसवायचे होते..

नाते झुलवायचे होते..
जरा फुलवायचे होते..
गंध मोकळ्या मनाचे..
तळ शोधायचे होते...

काही सांगायचे होते..
काही ऐकायचे होते..
ऐक सखे.....
जरा भेटायचे होते

~ संकेत पाटेकर
१७/०९/२०१६

बुधवार, १ एप्रिल, २०१५

ओंजळं फाटकी ..

अजूनही माझी हि  ओंजळं फाटकी
मुठीत  माझ्या काही न  राहती
मी असाच चालितो  रस्त्याकडेने
ओघळती  नजरां हळूच पाहती

असूनही नसते , मज देण्यास  काही
फाटकी ओंजळ मग रीतीच राही
ओशाळतो मी मनोमन अंतरी
सुखाचे  दोन क्षण देतो कुणा मी ?
- संकेत उर्फ संकु
०१.०४.२०१५ 

बुधवार, २५ फेब्रुवारी, २०१५

प्रेम ..........


आपल्या माणसाने दिलेली प्रेमाची हलकीशी साद सुद्धा
जेंव्हा मनातले अनेक वादळी तरंग क्षणात शांत करते ना ....ते म्हणजे 'प्रेम'
आपलेपणाची , पाठीवरली हलकीशी थाप सुद्धा मनाला जेंव्हा एक दिलासा देऊन जाते ना..
ते म्हणजे 'प्रेम'
मनातल्या भावनांना जिथे दुरूनच ओळखले जाते , वाचले जाते अन त्या तरल भावनेसाठी जिथे जीव ओतला जातो ना... ते म्हणजे 'प्रेम'
शब्दा शब्दात जिथे हास्य तरंग उमटले जाते अन जिथे वेदनेचे जखम हि हसत सोसले जाते ना ...
ते म्हणजे 'प्रेम'
.
क्षणभर आपल्या व्यक्तीपासून दूर गेलं कि मन कासावीस होवून उत्कट भेटीची जी ओढ लागते ना ...
ते म्हणजे 'प्रेम'
मनास कितीही यातना झाल्या तरी आपल्या व्यक्तीसाठी जिथे निर्मळ मनाने माफ केले जाते अन तिच्या चांगल्यासाठीच जिथे नेहमी चिंतले जाते ना ..ते म्हणजे 'प्रेम'
प्रेम म्हणजे अजून तरी काय ..


संकेत उर्फ संकु
१९.०२.२०१५


शुक्रवार, १२ डिसेंबर, २०१४

कळे ना तुझ्यापुढे...

कळे ना तुझ्यापुढे
हे मनं कसे उलगडावे
मनातल्या भावनांना
शब्दातं कसे विणवावे

तू अबोल मी अबोल
अबोल हे क्षण सारे
सांग बरे मनातले हे
द्वंद्वं कसे मिटवावे


- संकेत
१२.१२.२०१४

शुक्रवार, २६ सप्टेंबर, २०१४

मी आनंदी आनंदी ..

काही कळेनास झालंय
मनं रमेनास झालंय
काय सांगू मी तुम्हाला
प्रेम आटतं चाललंय !

कुठे होते गोड क्षण
कुठे प्रेमाचे ते बोल
कुठे दिवस तो छान
आता ढगाळ ढगाळ !


आठवणीत आता सारे
क्षण झाले जायबंदी
आठवणीतच आता
मी आनंदी आनंदी ..!

भावना मनातल्या
कविता माझ्या !

संकेत य पाटेकर
२६.०९.२०१४

सोमवार, १५ सप्टेंबर, २०१४

त्या उंचउडल्या घारीसारखे ...

घराच्या चौकटी मधून म्हणा , किंव्हा रस्त्याने जाता येता म्हणा ..उंच निळ्या आकाशी 'घारी' घरट्या घालताना दिसत असतात ... तेंव्हा आपलं 'मन' हि कल्पकतेचे कल्पितपंख लावून उंच आकाशी झेपावते ...... त्या अर्थी हि माझी कविता ...

त्या उंचउडल्या घारीसारखे
स्वच्छंदी होवुनी विहरावे
ह्या निळ्याभोर नभांगातुनी
अवघे हे विश्व पहावे !

ते राकट-कणखर सह्यकडे ,
ते वेडे वाकडे घाट दरे,
ते रुप गोजिरे क्षितीजाचे
डोळ्यात साठुनी घ्यावे !

त्या उंचउडल्या घारीसारखे
स्वच्छंदी होवुनी विहरावे !

तो रंग हिरवा रानाचा
तो गंध सुमधुर पुष्पांचा
तो मंद झुळका वाऱ्याचा
श्वासात कोंडूनी घ्यावे !

त्या उंचउडल्या घारीसारखे
स्वच्छंदी होवुनी विहरावे

ते गीत अंतरी जगताचे
नर्तन वर्तन पाखरांचे
बैसुनी टोकावरति कुठे
हरखुनी त्यात निघावे !

त्या उंचउडल्या घारीसारखे
स्वच्छंदी होवुनी विहरावे
ह्या निळ्याभोर नभांगातुनी
अवघे हे  विश्व पहावे !

- संकेत य पाटेकर
१५.०९.२०१४

गुरुवार, २१ ऑगस्ट, २०१४

आधार..

जगण्याचे हे किती तर्हे ,
किती संघर्षाचे भीषण कडे ,
थकल्या मनाचं कुणा
कधी आधार हि होता येत. !

लहान होता येतं
लहानचं मोठ हि होता येतं
दर्दभरल्या ह्या जीवनात
कुणाचं 'आनंद' हि होता येतं !

- संकेत य पाटेकर
१२.०८.२०१४

काय हरकत आहे...

काय हरकत आहे ,
मनासारखं कुठे सगळंच कधी मिळतं
पण जे मिळत थोडं फार त्यात
आनंद मानून घेण्यास
काय हरकत आहे ?

प्रेम तर व्हायचंच, नातं जुळायचंच
मग अपेक्षांचं ओझ तरी का ?
जे अनपेक्षितपणे पदरात पडत
त्यातच समाधान व्यक्त करण्यास
काय हरकत आहे ?
- संकेत य पाटेकर
१२.०८.२०१४