शनिवार, २७ ऑगस्ट, २०११

!! कविता माझी, माझ्या प्रेमळ आईची !!

"कविता माझी, माझ्या प्रेमळ आई ची
माझ्या स्वप्नी आलेल्या त्या मायेची"

आज ती आली होती
माझ्यासाठी, खास माझ्यासाठी
तिच्या लाडक्या ह्या मुलांसाठी
आज ती आली होती

माझ्या मनातील साऱ्या
प्रश्नांच निरासन करण्यासाठी
आज ती आली होती
माझ्या मनातील उठलेल्या
त्या तुफान वादळाला
शांत करायला, नाहीस करायला
आज ती आली होती

जीवनाविषयक दोन-चार शब्द
मला समजवून सांगायला
आज ती आली होती
माझ्यासाठी, खास माझ्यासाठी
तिच्या ह्या लाडक्या मुलासाठी
आज ती आली होती

किती शांत पण तितकाच
बोलका अन प्रसन्न
प्रेमळ चेहरा तिचा
पाहूनच मनातील हे वादळ
क्षणात दूर झाले,शांत झाले

तिच्या मायेने फिरवलेल्या हाताने
मन फार हेलावून गेले
डोळे भरून आले तिचे-माझेही
प्रेमळ आसंवांच्या धारांनी
मन बोलू लागले
प्रेमळ ममत्वानी भरलेल्या
मधुर-गोड अशा शब्दांनी

तिच्या उबदार मायेच्या कुशीत
शांत पडून मी होतो
तीच बोलन हळूच मी कानी घेत होतो
ती बोलत होती..मी ऐकत होतो
तिचे गोड मायेचे ते शब्द मी
माझ्या मनी साठवत होतो

तिच्या उबदार कुशीत
शांत झोपी मी कधी गेलो
ते माझंच मला कळलं नाही
जाग आली तेंव्हा
माझी लाडकी प्रेमळ आई
आसपास कुठेच दिसली नाही

निघून गेली ती पुन्हा
मला न सांगताच माघारी
डोळ्यात आसवे जमा करून
डोळ्यात आसवे जमा करून

जीवनाचा अर्थ सांगायला
आज ती आली होती
प्रेमाचे दोन शब्द बोलायला
आज ती आली होती

मला भेटण्यासाठी ,
खास माझ्यासाठी
आज ती आली होती
माझी प्रेमळ आई ...!!
संकेत य . पाटेकर
०५.०८.२०११

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

'आपलेपणचा हुंदका' तेवढा सहज निघतो रे ...

सहजह 'आठवण' यावी असं काही नसतं रे 'आपलेपणचा हुंदका' तेवढा सहज निघतो रे ...! विसरत नाही बघ तसं कुणी कुणालाच असे 'हृद...