बुधवार, २१ डिसेंबर, २०११

आठवण आहे म्हणून...

आठवण आहे म्हणून प्रेम आहे
प्रेम आहे म्हणून आठवण आहे

एक एक आठवण तुझी
जणू हृदयाचा
एक एक ठोका आहे.

डोळ्यातल्या बुबुळात देखील
तुझंच प्रतिबिंब आहे.

जिथे नजर जाईल तिथे
तुझंच प्रतिरूप आहे.

संकेत य .पाटेकर
१.१०.२०११

!! भावना मनातल्या,'कविता माझ्या !!: कुणीतरी असावंच लागत

!! भावना मनातल्या,'कविता माझ्या !!: कुणीतरी असावंच लागत: भावना ह्या समजायच्या असतात, त्या समजून घेणार कुणीतरी असाव लागत. प्रेम करायचं असत, त्यासाठीही कुणीतरी आपलंस असाव लागत. विचार अनेक असतात...

कुणीतरी असावंच लागत

भावना ह्या समजायच्या असतात,
त्या समजून घेणार कुणीतरी असाव लागत.

प्रेम करायचं असत,
त्यासाठीही कुणीतरी आपलंस असाव लागत.

विचार अनेक असतात मनात,
बरे-वाईट कसेही,
पण ते share करायला कुणीतरी असाव लागत

सुख-दुखात सदैव पाठीशी उभ असणार,
जवळच आपल म्हणणार अस कुणीतरी असावंच लागत

संकेत य पाटेकर
२१.०९.२०११

आठवणी

आठवणी असतात
नकळत च डोळ्यात अपुल्या
आसवे हे आणतात

आठवणी आठवणी असतात
मनात कायमचे घर करून
राहतात

आठवणी आठवणी असतात
नकळत कधी कधी
हसवू लागतात
हसता हसता रडू
आणतात

आठवणी आठवणी असतात
गोड प्रेमाच्या आठवणीची ओंजळ
हृदयात सामावून जातात

आठवणी आठवणी असतात
वार्याच्या हळुवार झोता प्रमाणे
मधूनच पुन्हा नकळत
स्पर्श करून जातात
आठवणी आठवणी असतात

संकेत य . पाटेकर
वेळ:- १०.५० सकाळ
वार :- गुरुवार



''बहिण -भाऊ''


माझ्या दोन प्रेमळ बहिणीसाठी हि खास कविता...


तू माझी बहिण
मी तुझा भाऊ
प्रेमाचं हे नातं
असंच अतूट ठेवू !!

नको कसला स्वार्थ त्यात
नको जराही राग
प्रेमाच्या ह्या बंधनात
असू दे प्रेमाचीच बात !!


असो थोडा रुसवा
असावा जरा धाक ,
प्रेमाच्या ह्या बंधनात
सोडू नको कधी साथ !!

तू माझी बहिण
मी तुझा भाऊ
प्रेमाचं हे नातं
असंच अतूट ठेवू !!

दु:ख तुझे सारे
मजपाशी येवो
सु:खाने आनंदाने
तुझे जीवन सरो !!

तुझी माया तुझं प्रेम
निरंतर असं राहो
प्रेमाचं हे नातं
असंच दृढ होवो !!

तू माझी बहिण
मी तुझा भाऊ
प्रेमाचं हे नातं
असंच अतूट ठेवू !!

संकेत य. पाटेकर
२०.१२.२०११
वेळ : दुपार ३:३०

हि ईमेज नेट वरून घेतली आहे

!! निसर्गाच्या सानिध्यात !!

निसर्गाच्या सानिध्यात
किती छान वाटत,
सोबत कुणी नसल तरी ,
कुणी असल्यासारखाच वाटत,

माघारी पावलांना
खरच थांबावेस वाटत ,
निसर्ग निसर्ग हा जवळून
पाहावेस वाटत ,

एकटेपणाला इथे
वावच कसला मिळत नाही ,
झाड - झुडपे , वेली , आकाश
पक्षी , नदी - ओढे ,
कसलंच कमी पडू देत नाही ,

नुसतंच आपल इथे बसाव ,
टकमक फक्त पाहत राहावं ,
निसर्गातील एक एक क्षणाचा
आनंद हा लुटत राहावं ,

दूर होतात सारे दुख इथे
दूर होतो सारा थकवा ,
निसर्गाच्या सान्निध्यात
असतो फक्त गारवा,

आठवड्यातून एकदा तरी ,
मन मुक्त भटकाव ,
निसर्गाच्या सान्निध्यात हरवून
त्याच्याशी ,सुंदर नात
जोडाव.

संकेत य पाटेकर
१९.१२.२०११
सोमवार
वेळ: दुपारी ३ वाजता



शुक्रवार, ९ डिसेंबर, २०११

दु:ख ह्या मनाचे...


दु:ख ह्या मनाचे कोणास
सांगू मी ?
भावना ह्या मनाच्या
कोणास सांगू मी ?

तळमळत मन माझं
एकाकी असे राहुनी
आठवणीच्या दुनियेत
आसवे असे वाहुनी !

का हे प्रेम असं
हसवून मला रडवतं
का हे प्रेम असं
रडता रडवता हसवतं !

जवळ प्रेम असताना
नको वाटते काही मला
तुझे शब्द ,तुझा सहवास
हवा असतो फक्त मला

शब्द ते तुझे गोड रसाळ
पियुनी मी हर्षितो
जीवनाच्या अथांग
सागरात स्वच्छंदी मी हिंडतो !

दूर होताच तू
तळमळत मन माझं
क्षण हे तुझ्या सोबतीचे
उरतात फक्त आठवणीतं !

क्षण हे तुझ्या सोबतीचे
उरतात फक्त आठवणीतं !

संकेत य. पाटेकर
०९.१२.२०११
शुक्रवार

'आपलेपणचा हुंदका' तेवढा सहज निघतो रे ...

सहजह 'आठवण' यावी असं काही नसतं रे 'आपलेपणचा हुंदका' तेवढा सहज निघतो रे ...! विसरत नाही बघ तसं कुणी कुणालाच असे 'हृद...