शुक्रवार, २७ जून, २०१४

सह्याद्रीची साद नवी ....

तिने म्हटलं , आज तुला लिहायला मी एक विषय दिलाय
मी म्हटल हळूच मनात , विषयांचाच ' कोलाज' झालाय .

हा विषय तो विषय, विषय हे ना ना विविध ,
विचार करून करून साला डोक्याचाच पार भुगा झालाय ,

तरीही लिहावं म्हणावं काही तर मूड हि बेपत्ता झालाय ,
मन नावच अजब रसायन SET हून UPSET झालाय ,

पुन्हा आता सेट होण्यास मनाला थोडी उसंत हवी
शनिवार रविवार आलाच जवळ '' सह्याद्रीची साद नवी ....

- संकेत पाटेकर
२७.०६.२०१४

बुधवार, ११ जून, २०१४

फेसबुक कविता...कुणीतर असतं...

कुणीतर असतं...
आपल्या प्रोफाईलला आठवणीनं भेट देणारं,
आपल्या प्रत्येक पोस्टला न चुकता ' LIKE' करणारं ,
त्यावर मनापासून अगदी प्रेमानं COMMENT करणारं ,
तर कधी ...
लपून छपून का होईना ती पोस्ट हळूवार वाचणार ,
तर कधी अर्धवट वाचून PAGE नुसतंच वर खाली करणारं,
वेळेअभावी मग बघू असंही म्हणणारं
कुणीतर असतं...
कधी मनापासून आपलं कौतुक करणारं ,
प्रेमानं INBOX मधून मोकळेपणान संवाद साधणारं
कुणीतर असतं...
आपलं..आपल्याशी नातं जुळवून घेणारं
दूर दूर राहूनही अगदी हृदयाशी घर करणारं.
कुणीतर असतं...
- संकेत य. पाटेकर
११.०६.२०१४

शुक्रवार, ६ जून, २०१४

तिच्या प्रेमभरल्या एका स्वराने..

तिच्या प्रेमभरल्या एका स्वराने
मनात असंख्य ' आनंदी ' वलय निर्माण होतात .
वाटावं बोलतं रहावं अन बोलतं राहावं तिच्याशी
पण आपणच आखलेली हि 'बंधनं' आड येतात .

तरीही हे मन आनंदात बागडतं.
इवल्याश्या त्या क्षणाने का होईना अगदी भरभरून जातं
इतुका क्षण तो ? पण ते हि काही कमी आहे का ?
म्हणून आहे त्यातच समाधानी मानून घेतं.

संकेत य पाटेकर
०६.०५.२०१४

'आपलेपणचा हुंदका' तेवढा सहज निघतो रे ...

सहजह 'आठवण' यावी असं काही नसतं रे 'आपलेपणचा हुंदका' तेवढा सहज निघतो रे ...! विसरत नाही बघ तसं कुणी कुणालाच असे 'हृद...