बुधवार, २१ डिसेंबर, २०११

!! निसर्गाच्या सानिध्यात !!

निसर्गाच्या सानिध्यात
किती छान वाटत,
सोबत कुणी नसल तरी ,
कुणी असल्यासारखाच वाटत,

माघारी पावलांना
खरच थांबावेस वाटत ,
निसर्ग निसर्ग हा जवळून
पाहावेस वाटत ,

एकटेपणाला इथे
वावच कसला मिळत नाही ,
झाड - झुडपे , वेली , आकाश
पक्षी , नदी - ओढे ,
कसलंच कमी पडू देत नाही ,

नुसतंच आपल इथे बसाव ,
टकमक फक्त पाहत राहावं ,
निसर्गातील एक एक क्षणाचा
आनंद हा लुटत राहावं ,

दूर होतात सारे दुख इथे
दूर होतो सारा थकवा ,
निसर्गाच्या सान्निध्यात
असतो फक्त गारवा,

आठवड्यातून एकदा तरी ,
मन मुक्त भटकाव ,
निसर्गाच्या सान्निध्यात हरवून
त्याच्याशी ,सुंदर नात
जोडाव.

संकेत य पाटेकर
१९.१२.२०११
सोमवार
वेळ: दुपारी ३ वाजता1 टिप्पणी:

'आपलेपणचा हुंदका' तेवढा सहज निघतो रे ...

सहजह 'आठवण' यावी असं काही नसतं रे 'आपलेपणचा हुंदका' तेवढा सहज निघतो रे ...! विसरत नाही बघ तसं कुणी कुणालाच असे 'हृद...