पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रेयशीची आठवण

कुणास ठाऊक सारखं अस का वाटत राहतं ? मन माझं तिच्या भोवती घिरट्या घालत राहतं ! किती हि दूर असो ती ती माझ्या हृदया जवळच असते मज संगे चालत असते मज संगे बोलत असते ! कधी कधी अस वाटतं तिला प्रत्यक्ष भेटून यावं चार शब्द बोलून प्रेमाचे मन हे आपलं हलकं करावं ! स्वप्नामधे हि तिचे दर्शन रोज मज होत असते चालून बोलून स्वप्नच ते प्रत्यक्षात मात्र दिसत नसते ! रस्तोरस्ते जाता येता अनेक प्रेमवीरांची जोडी दिसते मग नकळत मला माझ्या त्या प्रेयशीची आठवण येते ! - संकेत पाटेकर २६.०३.२०११