पोस्ट्स

जुलै, २०१२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाउस........

इमेज
पाउस........ हवा हवासा वाटणारा पाउस , कधी कधी नकोसा वाटतो , ऑफिस ला निघतानाच हा धो - धो का बरसतो ? छत्री असते जवळ तरी उपयोग तिचा काहीच नसतो वाऱ्यासंगे डोलणारा पाउस आपल्याच धुन्धीतच असतो दिशा दिशा हा धुंडाळतो पकडा पकडीचा खेळ जणू खेळतो छत्री असो वा रेनकोट हा मात्र पूर्णतः भिजवितो . हवा हवासा वाटणारा पाउस , कधी कधी खरच नकोसा वाटतो , ऑफिस ला निघतानाच हा धो - धो का बरसतो ? संकेत य पाटेकर ०४.०७.२०१२

कल्पनेतली ती...

इमेज
कल्पनेतली ती ... ती म्हणजे गुलाबाची नाजुकशी पाकळी ती म्हणजे हृदयातील स्पंदनाची साखळी ती म्हणजे पावसाळ्यातल्या सरीतली एक सर ती म्हणजे थंडीतल्या गारव्याची एक झळ ती म्हणजे गायनातील एक स्वरबद्ध तरंग ती म्हणजे मनातल्या भावनाचे विश्वरुपी अंग ती म्हणजे श्वासो श्वासातला एक दीर्घ श्वास ती म्हणजे कल्पनेतल्या विश्वाची एक प्रेमळ आस ती म्हणजे समुद्रातुनी उटलेली लाटेवरची एक लाट ती म्हणजे घाटावरची वेडी वाकडी वळणाची वाट ती म्हणजे नजेरेशी लपंडाव खेळणारी एक नयनपरी ती म्हणजे स्वप्नातली माझ्या एक स्वप्न सुंदरी संकेत य पाटेकर ०३.०.०२०१२

जे दिसत तसं मुळीच नसत ...

जे दिसत तसं मुळीच नसत आपल मन नेहमीच फसतं चूक काय बरोबर काय समजल तरी कळत नसत कळलं तरी उशिरा कळत मन भावनेच्या अधिपत्याखाली तोपर्यंत पूर्णतः जखडलेले असत - संकेत

सुखाची व्याख्या

इमेज
दुसऱ्यांचा विचार करण्यातच अर्धे आयुष्य निघून जाते स्वताहाचे पंख मात्र जमिनीवरच फडफडत राहते उडण्याची ताकद ती हळू वार क्षीण होत जाते आयुष्याच्या सुखाची व्याख्याच बदलून जाते संकेत य पाटेकर