पोस्ट्स

2014 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कळे ना तुझ्यापुढे...

कळे ना तुझ्यापुढे हे मनं कसे उलगडावे मनातल्या भावनांना शब्दातं कसे विणवावे तू अबोल मी अबोल अबोल हे क्षण सारे सांग बरे मनातले हे द्वंद्वं कसे मिटवावे - संकेत १२.१२.२०१४

मी आनंदी आनंदी ..

काही कळेनास झालंय मनं रमेनास झालंय काय सांगू मी तुम्हाला प्रेम आटतं चाललंय ! कुठे होते गोड क्षण कुठे प्रेमाचे ते बोल कुठे दिवस तो छान आता ढगाळ ढगाळ ! आठवणीत आता सारे क्षण झाले जायबंदी आठवणीतच आता मी आनंदी आनंदी ..! भावना मनातल्या कविता माझ्या ! संकेत य पाटेकर २६.०९.२०१४

त्या उंचउडल्या घारीसारखे ...

घराच्या चौकटी मधून म्हणा , किंव्हा रस्त्याने जाता येता म्हणा ..उंच निळ्या आकाशी 'घारी' घरट्या घालताना दिसत असतात ... तेंव्हा आपलं 'मन' हि कल्पकतेचे कल्पितपंख लावून उंच आकाशी झेपावते ...... त्या अर्थी हि माझी कविता ... त्या उंचउडल्या घारीसारखे स्वच्छंदी होवुनी विहरावे ह्या निळ्याभोर नभांगातुनी अवघे हे विश्व पहावे ! ते राकट-कणखर सह्यकडे , ते वेडे वाकडे घाट दरे, ते रुप गोजिरे क्षितीजाचे डोळ्यात साठुनी घ्यावे ! त्या उंचउडल्या घारीसारखे स्वच्छंदी होवुनी विहरावे ! तो रंग हिरवा रानाचा तो गंध सुमधुर पुष्पांचा तो मंद झुळका वाऱ्याचा श्वासात कोंडूनी घ्यावे ! त्या उंचउडल्या घारीसारखे स्वच्छंदी होवुनी विहरावे ते गीत अंतरी जगताचे नर्तन वर्तन पाखरांचे बैसुनी टोकावरति कुठे हरखुनी त्यात निघावे ! त्या उंचउडल्या घारीसारखे स्वच्छंदी होवुनी विहरावे ह्या निळ्याभोर नभांगातुनी अवघे हे  विश्व पहावे ! - संकेत य पाटेकर १५.०९.२०१४

आधार..

जगण्याचे हे किती तर्हे , किती संघर्षाचे भीषण कडे , थकल्या मनाचं कुणा कधी आधार हि होता येत. ! लहान होता येतं लहानचं मोठ हि होता येतं दर्दभरल्या ह्या जीवनात कुणाचं 'आनंद' हि होता येतं ! - संकेत य पाटेकर १२.०८.२०१४

काय हरकत आहे...

काय हरकत आहे , मनासारखं कुठे सगळंच कधी मिळतं पण जे मिळत थोडं फार त्यात आनंद मानून घेण्यास काय हरकत आहे ? प्रेम तर व्हायचंच, नातं जुळायचंच मग अपेक्षांचं ओझ तरी का ? जे अनपेक्षितपणे पदरात पडत त्यातच समाधान व्यक्त करण्यास काय हरकत आहे ? - संकेत य पाटेकर १२.०८.२०१४

पाऊस वाट ...

धुंदमुंद पाउस , मन हि वेडेबावरे वाटे' मुक्त ' होवुनी क्षणात चिंब न्हावे , धरली वाट एकट्याची , त्या वाटेवरी स्थिरावे घेउनि थेंब टपोरे , आसमंत न्याहाळावे ! मेघांचे स्वर गाणे, लहरी गार वारे सळसळाट पानांचा, मज अंगी भिनावे पिउनि स्वरगीतं , होवुनी हर्षमुख , एक थेंब तो सरींचा ,मिसळूनी त्यात जावे ! गवतांच्या पात्यातुनी , मोत्यांची माळ वाहे , शेतात बांध जलाचा , खळखळाटुनि पहा वाहे , इवल्याश्या पाखरांची , ती नौका इवली तरंगे , खेळ तो अंतरीचा , मन बाळपनित रंगे ! कौलारू त्या छपरांचा , साज फार मोठा अंगणात बघा त्या , सड सर पाघोळ्यांचा मन भरून येई , फुलं झडून जाई , वाटेवरी त्या गंध वाहे फुलाचा ! वाटे हि वाट मातीची , वळण घेउनि जावे , चिखलातुनि माखुनी , मातीशी बंध जुळावे उमटूनी ठसे पायांचे , मागे वळूनी पाहे , त्या गोड आठवणीना , हळूच ओंजळीत घ्यावे . ! जीवन हे असे हे , एकल्या वाटेचे जुळुनी स्नेहबंध , पाय वाटे निघावे ! - संकेत पाटेकर १६.०७.२०१४

सह्याद्रीची साद नवी ....

तिने म्हटलं , आज तुला लिहायला मी एक विषय दिलाय मी म्हटल हळूच मनात , विषयांचाच ' कोलाज' झालाय . हा विषय तो विषय, विषय हे ना ना विविध , विचार करून करून साला डोक्याचाच पार भुगा झालाय , तरीही लिहावं म्हणावं काही तर मूड हि बेपत्ता झालाय , मन नावच अजब रसायन SET हून UPSET झालाय , पुन्हा आता सेट होण्यास मनाला थोडी उसंत हवी शनिवार रविवार आलाच जवळ '' सह्याद्रीची साद नवी .... - संकेत पाटेकर २७.०६.२०१४

फेसबुक कविता...कुणीतर असतं...

कुणीतर असतं... आपल्या प्रोफाईलला आठवणीनं भेट देणारं, आपल्या प्रत्येक पोस्टला न चुकता ' LIKE' करणारं , त्यावर मनापासून अगदी प्रेमानं COMMENT करणारं , तर कधी ... लपून छपून का होईना ती पोस्ट हळूवार वाचणार , तर कधी अर्धवट वाचून PAGE नुसतंच वर खाली करणारं, वेळेअभावी मग बघू असंही म्हणणारं कुणीतर असतं... कधी मनापासून आपलं कौतुक करणारं , प्रेमानं INBOX मधून मोकळेपणान संवाद साधणारं कुणीतर असतं... आपलं..आपल्याशी नातं जुळवून घेणारं दूर दूर राहूनही अगदी हृदयाशी घर करणारं. कुणीतर असतं... - संकेत य. पाटेकर ११.०६.२०१४

तिच्या प्रेमभरल्या एका स्वराने..

तिच्या प्रेमभरल्या एका स्वराने मनात असंख्य ' आनंदी ' वलय निर्माण होतात . वाटावं बोलतं रहावं अन बोलतं राहावं तिच्याशी पण आपणच आखलेली हि 'बंधनं' आड येतात . तरीही हे मन आनंदात बागडतं. इवल्याश्या त्या क्षणाने का होईना अगदी भरभरून जातं इतुका क्षण तो ? पण ते हि काही कमी आहे का ? म्हणून आहे त्यातच समाधानी मानून घेतं. संकेत य पाटेकर ०६.०५.२०१४

तुझ्या अश्या वागण्याचं...

तुझ्या अश्या वागण्याचं कारणच कळत नाही मी बोलत राहतो तू काहीच बोलत नाही संवाद होतो, तेवढ्यापुरतं तेही माझ्याकडून , अगदीच फोनवरून मीच एकटा बडबडतो तू प्रतीसादच देत नाही तुझ्या अश्या वागण्याचं कारणच कळत नाही. भेटावयाचं म्हणावं कधी तर तू ' होय नाय 'म्हणत नाही . वाट पाहतो वेड्यावाणी तो ' क्षण' काही येत नाही . तुझ्या अश्या वागण्याचं कारणच कळत नाही. मनातली हि वेडी आशा अजूनही हार घेत नाही. मी बोलत राहतो तू काहीच बोलत नाही संकेत य पाटेकर १३.०५.२०१४

प्रेम...,

इमेज
' प्रेम ' हि अशी गोष्ट आहे , जी मागूनही कधी मिळत नाही . ना जबरदस्तीने कुणाकडून कधी हिसकावून हि घेता येत नाही . अन ना कधी पैशाने विकत घेता येत ना हि कधी ते कर्जाने मिळावे म्हणून एखादी वस्तू गहाण ठेवता येत. ते मिळतं ते फक्त आपलेपणातून आपलेपणाच्या आंतरिक ओढीतून मनातल्या निरागस इच्छेतून परिमल शब्दातून , हृदयाच्या काळजीवाहू स्पंदनातून मोकळ्या श्वासातून , अलगद कोमल स्पर्शातून अन न तुटनारया अश्या अतूट विश्वासातून .. प्रेम प्रेम अन प्रेम हवं असतं तेंव्हा मागूनही मिळत नाही अन न मागताच मिळत तेंव्हा आनंदाला सीमाच उरत नाही . संकेत उर्फ संकु ११.०५.२०१४

चारोळ्या ...

मनगटावरचं घड्याळ सुद्धा टिकटिक करत बजावतं 'वर्तमानात जगून घे रे' नाहीतर 'श्वास ' बंद पडायचं - संकेत ०६.०३.२०१६ ______________________________________________________ ______________________________________________________ मी लिहतो तसा असेनच असे काही नाही.. पण लिहतो तसा जगण्याचा प्रयत्न माझा राही. - संकेत ______________________________________________________ ______________________________________________________ मी हि कधी कुणावर प्रेम केलं होतं मी हि मनाशी एक स्वप्नं जुळवलं होतं. - संकेत ______________________________________________________ ______________________________________________________ तुझ्या सारखी तूच सखे तुझ्यविना ना कुणी दिसे ना तुझ्यावाचून काही सुचे तूच असे रे ध्यानी - मनी तूच रे सखी साजनी... - तुझाच - - संकेत ______________________________________________________ _____________________________________________________ प्रेम हे हंसरं असतं प्रेम हे दुखण असतं प्रेम असते मनाची ढाल प्रेम असते मनाचीच एक चाल.. - संकेत ___

देवा भेटू दे रे एखादी ... मनासारखी

देवा भेटू दे रे एखादी ...................... मनासारखी लग्न : हा विषयच असा आहे कि एकदा आपण त्या वयाचे झालो कि घरातल्याना प्रश्न पडतो ... कधी करतोयस रे बाबा लग्न ? कर एकदाचे लगीन .. .आम्ही वर पोहोचल्यावर करशील का ??? काय बोलायचं ह्या ह्यांना, आपल्या मनातले हाल ते जाणतच नाही ................ कुणी मनासारखी मिळाल्याशिवाय कस काय करणार लगीन ?? वर ना ना प्रश्न नि समस्या ..................... हुश्श ......................देवा देवा देवा देवा भेटू दे रे एखादी नाजूक साजूक गोरी गोरी नाकात नथनी , नउवारीसाडी मर्र्हाट मोळी शोभणारी मराठी भाषिक असणारी मराठीचा अभिमान बाळगनारी मराठी अस्मिता जपणारी गोड गोड हसणारी गालातल्या गाळात रुसणारी नटखटपनेत भाळनारी साधी भोळी अन तितकीच पेमळ मनाची ,मला शोभणारी देवा भेटू दे रे एखादी हृदयाशी संवाद साधणारी मनातल धन जाणणारी विचारांच्या भरगर्दीत मला सामावून घेणारी नातं जपणारी मनापासून प्रेम करणारी सर्वांच हित जपणारी साधी भोळी तितकीच स्पष्टवक्तेपणा जाणणारी देवा भेटू दे रे एखादी गोड हसरी ....जीवनभर सोबत , साथ देणारी . भेटू दे लवकर .. :))

कसं समजावू ह्या मनाला ...

जुळलेल्या जिवलग नात्यापासून कितीही दूर राहण्याचा प्रयत्न करा ......... ते शक्य होत नाही ...........,,, मन परत माघारी फिरतं... वळत त्याच वाटेकडे त्याच दिशेने ,,,पुन्हा ,....पुन्हा.. आठवणीतल्या अनमोल क्षणांच्या लयीत स्वतःच भान हरपत .....नव्या आशेने ...त्याच प्रेमाच्या ओढीने .. शब्दमाळा गुंफत ... खूप miss करतोय ......... खूप आठवण येतेय तुझी........... कसं समजावू ह्या मनाला ... ते माझं मुळीच ऐकत नाही ..... तुझ्यावाचून दूर जाणे त्यास सहनच होत नाही . मनातले काही .... - संकेत १२.०२.२०१४

तू का अशी वागतेस ?

काहीच कळत नाही .......तू का अशी वागतेस काहीच उमजत नाही .....दूर का तू अशी जातेस वेडी असते माया ............वेड असत प्रेम प्रेमाच्या शब्दांना ...........तू का तोडू पाहतेस ..!! काहीच कळत नाही .......तू का अशी वागतेस ... विचारांच्या गर्दीत .........का गर्क राहतेस ? वेड असत मन ............वेडी असते आशा आशेच्या किरनेला .......तू का धिक्कारु पाहतेस तू का अशी वागतेस - संकेत य पाटेकर

खरचं एक बहिण असावी...

खरचं एक बहिण असावी भरभरून प्रेम करणारी मायेच्या अलगद स्पर्शाने मनाला जपणारी ! खरचं एक बहिण असावी भरभरून बोलणारी , शब्दांच्या स्वर सागरातून मन तजेल करणारी खरचं एक बहिण असावी नटखटून रंगणारी रंगाच्या विविधतेतून हास्य रंग फुलवणारी खरचं एक बहिण असावी भरभरून प्रेम करणारी सख्खी असो व नसो नेहमीच पाठीशी ठाम उभी राहणारी ! संकेत य पाटेकर ३० मे २०१३

माणूसपण...

इमेज
कुणी आपुलकीनं जवळ घेतं कुणी प्रेमानं जवळ नेतं कुणी शब्दांच्या धारेतून ओल्या वेदनांच जखम देत . कुणी ' मूर्खाच ' ग्रेड देत कुणी 'ग्रेट ' म्हणुनी जातं कुणी क्षणांच्या सोबतीनं वेड्या मायेच छत देत . कुणी वाह , कुणी शाब्बास कुणी कौतुकाची थाप देतं कुणी मूकपणाने हे सारे क्षण नजरेत टिपून घेतं कुणी जीवापाड प्रेम देत कुणी प्रेमात हरवूनी नेतं कुणी वेळेच्या संगतीनं स्वतहाच बदलून जातं क्षण हे असे , हास्याचे , दु:खाचे , प्रेमळ शब्दांचे , हळुवार स्पर्शाचे , मायेचे , नव्या उत्साहाचे , नव्या प्रेरणेचे , माणूसपण घडवून देत . संकेत य पाटेकर ०६.०१.२०१४ सोमवार भावना मनातल्या कविता माझ्या !