पोस्ट्स

एप्रिल, २०१२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

'अजून थोड वेळ दे मला'

'अजून थोड वेळ दे मला' तीच हे वाक्य अजून मनी घुमतंय तिच्या डोळ्यातील कारुण्यभाव नजरेसमोर उरतय थरथरते ओठ तिचे ओलेचिंब शब्द ते अश्रुंचे थेंब अन कारुण्यरूपी भाव ते पाहताच तिच्याकडे हृदय हि पाणावले आज माझ्या मुळे अश्रू तिने वाहिले वाटले वाईट मनास फार लागले आज माझ्यामुळे डोळे तिचे पाझरले क्षण किती निष्ठुर हे का कसे कठोर होतात का कुण्या प्रेमळ मनास बंदिस्त करू पाहतात हास्य जीवन असता परिस्थिती घाव घालते आनंदमय वातावरणात मग दुखाचेच निखारे वाहते असले असे तरीही न डगमगणारे मन ते तिचे असल्या परिस्थिती पुढे झुकेलच कसे ते एकच मागणी आहे तिची साथ तुझी राहू दे परिस्थितीशी झुंजायाला थोडा वेळ मला अजून दे न समजणारे माझे मन नेहमीच गैसमज करून घेत असे भेटी-गाठी , बोलन टाळते म्हणून नेहमीच तिच्याशी भांडत असे . आज प्रत्यक्ष भेटीत मात्र सारे काही उमगले माझ्या मनास खर काय ते आज कुठे कळले एक मागणी त्या ईशकडे सगळ काही ठीक कर तिचे जीवन आनंदी अन सुखद कर !! संकेत य पाटेकर दि: १९.०४.२०१२ वार : गुरवार