पोस्ट्स

मे, २०१२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तुझं माझं नातं ...

इमेज
नातं .........एक अनमोल नातं नांत म्हटल कि त्यात आला जिव्हाळा , ममत्व , प्रेम , विश्वास , सहवास ,अबोला , प्रमळ राग आणि खट्याळ मस्ती . नातं म्हणजे एक रेशीम गाठ असते ...जन्मोजान्माची.............नांत म्हणजे बघा वाचा माझी हि कविता .......कशी वाटली ते नक्की सांगा ..! तुझ माझ नातं ................. तुझं माझं नातं जस समुंदराच्या पाण्यातल आकाशाच निळेशार छत तुझं माझं नातं जस पावसाच्या सरी मधलं आनंदाच नाच तुझं माझं नातं जस फुलांच्या पाकळ्यान मधला मधाचा मधुर मधरस तुझं माझं नातं जस आंब्याच्या वनराईत आब्यान्चाच सुगंधित रस तुझ माझ नातं जस चांदण अन चंद्राच शीतल सौम्य प्रकाश तुझं माझं नातं जस तलावाच्या तळाशी रुतलेल कमळाच देठ तुझं माझं नातं जस वाऱ्याच्या स्वरलहरी ने शहारलेल गवताचं पातं तुझं माझं नातं जस शब्दांनी शब्दांना दिलेला प्रेमळ प्रतिसाद तुझं माझं नातं त्या ईश्वराचीच एक अनमोल भेट तुझं माझं नातं म्हणजे जन्मा जन्माची ची प्रेमळ, अतूट विश्वसणीय अशी रेशीम गाठ संकेत य पाटेकर ३०.०५.२०१२ मंगळवार

आठवणी ह्या आठवणी ..

इमेज
हळूच वाऱ्याचा झुळूक अंगावर यावा .....अन मनाला हुरहुरी यावी तशा ह्या आठवणी ... हळूच कुठून येतात. .. अन मनाला आपल्या जंजाळ्यात पार गुंतवून ठेवतात काही क्षण . आठवणी ह्या आठवणी ताज्या- जुन्या ,नवं - नवीन ह्या आठवणी दिशा चुकवून कुठूनही भुलवुनी येती ह्या आठवणी मनी रमती मनी खेळती हासवे - आसू गाळती ह्या आठवणी प्रवास दुनियाचा करुनी सुख- दुखाचा परिपाठ गाती ह्या आठवणी ह्या आठवणी .... आठवणी ह्या आठवणी ताज्या- जुन्या ,नवं - नवीन ह्या आठवणी संकेत य पाटेकर २९.०५.२०१२ मंगळवार

का म्हणून दुख ओढावून घ्यायचे ...........................

इमेज
का म्हणून दुख ओढावून घ्यायचे ? का म्हणून 'मन' दुखाच्या डोहात ढकलायचे ? नशिबातच ज्या गोष्टी नाहीत त्यांना का म्हणून इतक महत्व द्यायचे झाल गेल सर्व आता विसरायचे आयुष्य हे भरभरून जगायचे दुसऱ्यांच हित मात्र जपायचे हसता हसता हे जीवन एकट्यानेच जगायचे नाही कुणीच आपल तरी आपण मात्र इतरांसाठीच व्हायचं हृदयातल्या नक्षीदार कागदावर आठ्वणींच ठस उमटवायच आयुष्य हे भरभरून जगायचं झाल गेल सर्व विसरायचं दुसऱ्यांच हित मात्र जपायचं हसता हसता हे जीवन एकट्यानेच जगायचं संकेत य पाटेकर १९.०५.२०१२ शनिवार वेळ:- दुपार : १:३०  

नाही काही मागत तुझ्याकडून

नाही काही मागत तुझ्याकडून मला फक्त तुझ प्रेम हवंय क्षितिजाकडे उंच झेप घेताना सोबत फक्त तुझी हवेय नाही भेटन , नाही बोलन हृदयात तुझ्या स्थान हवंय आठवणींच्या असंख्य गर्दीत एक आठवण म्हणून माझ नाव हवंय नाही काही मागत तुझ्याकडून मला फक्त तुझ प्रेम हवंय... संकेत य पाटेकर ०५.०५.२०१२ शनिवार

असावा एक प्रेमळ सहवास ...

असावा एक प्रेमळ सहवास , त्या सहवासात मी मलाच विसरून जाव, असावा एक प्रेमळ स्पर्श त्या स्पर्शात सारे दु:ख विरघळून जाव असावा ते गोड अन गोजिरवाणे शब्द, त्या शब्दात मी मंत्रमुग्ध होवून जाव असावी एक अतूट साथ , जिच्या सोबतीने आयुष्य हे बहरून निघावं असावी एक प्रेमळ -सोज्वळ -मनमिळावू अशी 'ती' तिच्या सोबत मी विवाह बद्ध होऊन जाव संकेत य पाटेकर ०३.०५.२०१२