पोस्ट्स

मार्च, २०१२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

!! एक मागण तुझ्याकडे ..!!

!! एक मागणं तुझ्याकडे ..!! कोणतेही नातं असो ...देवा , अंतर त्यात कधी पाडू नकोस अंतर पाडण्याइतपत दुर्बुद्धी मज कधी देऊ नकोस मेलो तरी बेहत्तर पण प्रेम माझं कमी होऊ देऊ नकोस मेल्यावर ही आठवणी माझ्या विसरून त्यांना कधी देऊ नकोस संकेत य पाटेकर ०७.१२.२०१२ मंगळवार

एकांतवास ............

काय कुणास ठाऊक हल्ली एकट एकट वाटत सोबत कुणीच  नाही असंच सारख भासत नात्यातले बंधन देखील तुटल्या सारखेच वाटतात दूरवर निघून जावे तसे सारेच मला भासतात सहवास ज्यांचा हवा तेच दूर जाऊ पाहतात मनाला माझ्या का असे ते एकटे करू पाहताहेत घुटमळत मन आता अशा ह्या एकांतात खरच नको मला असा हा एकांतवास खरच नको मला असा हा एकांतवास ...!! संकेत य पाटेकर २१ फेब्रुवारी २०१२ मंगळवार वेळ सकाळचे  :- ११:३५

ज्या ज्या वेळी तुझी भेट घडते ...........

ज्या ज्या वेळी तुझी भेट घडते नजर तुझ्या डोळ्यावर स्थिरते डोळ्यातील त्या बुबुलांमध्ये मज दु:खाचेच निखारे दिसते चेहर्याच्या त्या हास्यामागे दुख तुझे ते लपून राहते एकांतपणात मात्र सारे आसू मार्गे वाहत जाते असतो मी समोर तरीही दु:ख तुझे ते पाहत राहतो दु:खाच्या जलसागरात  त्या स्वताहा मी बुडून जातो असते मनी खूप माझ्या हसत-खेळत तुला पाहावं तुझ्या त्या गोड हास्याने जीवन तुझ फुलाव तुझ्या दुखाचे भार सारे मज खांद्यावर हळूच घ्यावं दुखाच्या ह्या जंजाळातून अलगद तुला बाहेर काढव असली मनी इच्छा अशी तरीही हाती आपुल्या काहीच नसते निसर्गाच चक्र सारे जीवन हे असेच असते जीवन हे असेच असते संकेत य पाटेकर ०२.०२.२०१२ गुरुवार

कुणीतरी हव आहे.....

कुणीतरी हव आहे माझ मन जाणून घेणार, कुणीतरी हव आहे , माझ मन समजून घेणार, कुणीतरी हव आहे, नेहमी साथ मला देणार, कुणीतरी हव आहे, माझ्यावर खूप प्रेम करणार -संकेत

मन नाराज आहे तुझ्यावर

इमेज
मन नाराज आहे तुझ्यावर तुझ्या त्या चिडचिडपनावर, तुझ्या त्या अनियंत्रित रागावर तुझ्या त्या अबोलपणावर मन नाराज आहे तुझ्यावर तुझ्या अंतर्मनात उठलेल्या त्या असंख्य अशा वादळी विचारांवर , तुझ्या त्या एकटक शांत बसण्यावर, तुझ्या त्या दु:खी मनावर मन नाराज आहे तुझ्यावर तुझ्या मनात उठ्नारया तमाम प्रश्नांवर तुझ्या त्या न मिळणारया अनेक उत्तरांवर तुझ्या त्या होणाऱ्या त्रासावर मन नाराज आहे तुझ्यावर तुझ्या अशा ह्या स्वभावावर तुझ्या गर्दीत असूनही एकटे असण्यावर तुझ्या एकाकीपणावर मन नाराज आहे तुझ्यावर तुझ्या हिरमुसल्या नाराज अशा चेहऱ्यावर तुझ्या चेहर्यावर उमटलेल्या त्या असंख्य चिंता - आणि दुखमय जीवनावर मन नाराज आहे तुझ्यावर खर हे जीवन ना हसता हसता जगायचं असत सोबत कुणी नसल तरी सोबती आपल आपण व्हायचं असत प्रेम मिळो अथवा ना मिळो प्रेम मात्र आपण करायचं असत प्रेमळ मनाने प्रेम हे हळूच फुलवायचं असत दुख अपार आहेत पण थोड आपण सावरायचं असत हसता हसता दुसर्याला नकळत हसवायचं असत -श्रद्धा (बहिण ) -संकेत य पाटेकर ०७.०१.२०१२ शनिवार मी आणि माझी बहिण श्रध्दा , आम्हा

चला गड्यांनो ...

इमेज
चला गड्यांनो महाराष्टाचे गुणगान आपण गाऊ सह्याद्रीच्या या उंच शिखरावर पाउल आपुले ठेवू जोडूनी दोन्ही हात मस्तक देवीपुढे ठेवू कळसू आई चे आशीर्वाद घेउनी या दर्या खोर्यातुनी फिरू ठेउनी पाउल या शिखरावरती विजयी , स्वरबद्ध लहरी वाहू वारयासंगे बोल अपुले ह्या दऱ्या खोर्यातुनी घुमवू पाहुनी रांगा ह्या सह्याद्रीच्या भान आपुले हरवू सह्याद्रीतील इतिहासाचे गड-किल्ल्याचे पान आपण उघडू पाहुनिया सारा हा इतिहास नतमस्तक त्यापुढे होऊ सह्याद्रीतील ह्या राजाचे अपुल्या छत्रपती शिवरायांचे चला स्मरण आपण करू सिंह गर्जना देऊन ह्या दिशा सार्या उजळवू महाराष्टाचे , छत्रपती शिवरायांचे चला गुणगान आपण गाऊ चला गड्यांनो ... संकेत य पाटेकर १९.०३.२०१२ दोन आठवड्यापूर्वी कळसुबाई ह्या महाराष्ट्रातील सर्वात उंच अशा शिखरावर जाऊन आलो , त्यानिमित्त त्याबद्दल काही दिवसांपूर्वी लेखन सुरु केल होत . माझ्या ब्लोग साठी . .. ते लिहित असताना ....हि छोटीसी साधी - भोळी कविता सुचली ....ती तुमच्या समोर सादर करीत आहे. कशी वाटली ते नक्की सांगा ......!!

कोण कुणाच नाही ...

नाही ह्याचा नाही त्याचा नाही मी कुणाचा मी आहे माझा मी आहे माझाच आहे मी स्व:ताचा कुठल नातं , कसल नातं इथे कोण कुणाच नाही स्वता:हा साठी जगतो आपण बस्स दुसर काही नाही घडतात भेटी , जुळतात नाती समाधानी आपण पावेतो प्रेम ओसरताच क्षणी हळूच दूर फेकलो जातो प्रेम म्हणजेच जीवन प्रेम म्हणजेच सार काही असं असता हि ? का तुटतात ह्या अनमोल नाती स्व:ताहा मध्ये झोकून पाहिलं कि कळत सार काही स्वार्थापायी जगतो आपण बस्स दुसर काही नाही. दुसर काही नाही. संकेत य पाटेकर १६.०३.२०१२ शुक्रवार

!! नकळतच !!

नकळत आपण कुणाच्या आयुष्यात कधी येऊन जातो अन प्रेमाच्या गर्द छायेत नकळत हरवून हि जातो. नकळत नात्याचं अतूट बंधनात आपण गुंतले जातो अन नात्यात्तील सुगंधित , प्रफ्फुल्लीत अन सुवासिक वातावरणात चैतन्यमय होवून जातो. कळत नकळतच काही नाती जुळल्या जातात अशा अन आपुलकी, प्रेम, सदभावना ह्यांनी मन हळूच बहरून जात. संकेत य पाटेकर ०७.०३.२०१२ !!भावना मनातल्या कविता माझ्या !!