पोस्ट्स

2016 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एवढंच मनाला सांगायचं....

रिमझिमणाऱ्या पावसाळा का बरं घाबरायंच ? छत्री आहे नं संगीतनं, धो धो बरस, एवढंच आपण म्हणायचं... दीड दमड्या ह्या समस्यांना का बरं भ्यायचं ? दृढ विश्वास आहे नं संगीतनं, बिनधास्त यावं कधीहि , एवढंच आपण म्हणायचं.. रोजच्या जगण्यालाही ह्या का कंटाळायचं ? का उदासवाणि व्हायचं ? जीवन सुंदर आहे. दृष्टिकोन फक्त बदल, एवढंच मनाला सांगायचं....  - संकेत 

ऐक सखे....

काही सांगायचे होते.. काही ऐकायचे होते.. काही जुन्या क्षणांना.. जरा गोंजरायचे होते.. क्षण हसवायचे होते.. जरा रुसवायचे होते.. मनं, नव्या क्षणांशी .. जरा मिसळायचे होते.. भाव निरखायचे होते.. हृदयी जमवायचे होते.. मन तुझे आणि माझे.. जरा उसवायचे होते.. नाते झुलवायचे होते.. जरा फुलवायचे होते.. गंध मोकळ्या मनाचे.. तळ शोधायचे होते... काही सांगायचे होते.. काही ऐकायचे होते.. ऐक सखे..... जरा भेटायचे होते ~ संकेत पाटेकर १७/०९/२०१६