पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सहज सुंदर हास्य तुझे

सहज सुंदर हास्य तुझे सहज सुंदर बोल सहज सुंदर रुप असे कि मनास करती गोड - संकेत

चला मित्रांनो आपण थोडं हसू ..!!

इमेज
कुणास ठाऊक आज आहोत उद्या आपण नसू चला मित्रांनो आपण थोडं हसू ..!! चला कुठे भेटू गप्पात दंग नाचू चला मित्रांनो आपण थोडं हसू ..!! कुणास ठाऊक आज आहोत उद्या आपण नसू चला मित्रांनो आपण थोडं हसू ..!! हसू स्वतहा अन आसू इतर पुसू चला मित्रहो जीवनहास्य आता शिकू !! कुणास ठाऊक , आज आहोत उद्या आपण नसू चला मित्रांनो आपण थोडं हसू ..!! संकेत पाटेकर ०१.१०.२०१३ भावना मनातल्या कविता माझ्या !!

राहिल्या त्या फक्त आठवणी ..

हरवली ती वाट हरवली दिशा हरवले जे होते माझे काही !! हरवले ते बोल हरवले ते शब्द हरवला संवाद ज्यात होते प्रेम काही !! हरवले ते क्षण हरवले ते मन हरवला त्या क्षणाचा सुगंध काही !! हरवले ती भेट हरवली ती बैठक हरवले ती एकजूट ज्यात ना उरले काही !! राहिल्या त्या फक्त आठवणी - संकेत पाटेकर २५.०९.२०१३ भावना मनातल्या कविता माझ्या ..!!