पोस्ट्स

मार्च, २०१३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आयुष्य म्हणजे

आयुष्य म्हणजे जणू एक पत्र पेटी भली मोठी आपल्या अनमोल क्षणांना आठवणी स्वरूपात पत्रात गुंडाळून आपल्यात सामावून घेणारी. अन नकळत त्या पत्रातील मधुर अक्षरे कधीतरी ह्या उनाड वाऱ्यासोबत दूरवर उधळणारी - संकेत २८.०८.२०१२

शांत वळणावरल्या त्या वाटेवरती...

इमेज
शांत वळणावरल्या त्या वाटेवरती गाडी तिच्या वेगात धावत होती झाडे झुडपे , घरटी , इमारती सारी कशी झप झप मागे पळत सुटली होती मी आपला तसाच उभा दाराशी , एकटक त्या उंबरठ्याशी वाऱ्याशी सलगी करत , स्वताहाच मन हरवत काही शब्द मनाशीच पुटपुटत , वेगळ्याच विश्वात रमलो होतो , आजचा प्रेमाचा दिवस ..valentine day प्रेमाचा हा दिवस खरा पण कुणीच नाही म्हणून क्षणात मिसळून गेलो होतो कोण असेल , कशी दिसत असेल , बोलकी असेल , कि शांत शांत राहणारी असेल , मनापासून प्रेम करणारी असेल , कि मनाला प्रेमापासून दूर ठेवणारी असेल कशी असेल ती .........कधी भेटेल ती ..... ह्यातच गढून गेलो होतो ..... शांत वळणावरल्या त्या वाटेवरती ...... तिच्या भाव विश्वात मी हरवून गेलो होतो .... संकेत पाटेकर १५ फेब्रुवारी २०१३

नात्यांच्या ह्या रेशीम गाठी ...

इमेज
मनासारखी अवघड गोष्ट नाही , नाही आपल्या ताब्यात ठेवता येत नाही त्यास जेरबंद करता येत नसतो त्याला कसला रंग नि गंध नसतो कसला आकार, उकार पण तरीही त्याच अस्तित्व असत. आणि म्हणूनच आपल्या सभोवतालच परिसर नेहमी सुख- दुखात बरसत असत एखाद्याच 'मन' राखणं ते जपणं तेही आपलं स्वतःच मन सांभाळून , फारच कठीण ...असतं कारण आयुष्यात बरे वाईट अपघात हे होतच असतात त्या त्या ठराविक वेळेस ..त्या त्या क्षणी आणि त्या नुसार आपल्या मनाचे धागे हि बदलत राहतात , आणि अशा परिस्थितीत हि आपल्या सोबत इतरांचं मन संभाळण हे फारच कठीण होवून जातं ........... काही वेळेस अशाने इतर ''मन '' हि दुखावली जातात , रुसली जातात .........आणि त्या रुसव्या मनास पुन्हा हसवण हे आपल कर्तव्यच... ते करावच लागतं ..काही वेळा ते अवघड असत , काही वेळा सोपं.. आपलं मन जरी एक असलं तरी ....नाती अनेक असल्यामुळे ... नात्यानं सोबत त्या त्या व्यक्तीच्या मनाचा विचार करन , त्याला जपन हि भाग पडत जीवन हे नात्यांच्या अनेक रेशमी गाठींनी बांधलेलं असत , आणि ती रेशमी गाठ जशीच्या तशी भक्कम ठेवायची असेल तर .....इतरांच्या मनाचा वि
इमेज
प्रत्येक शब्दाने मनावर जखम होतेच असे नाही झालेली जखम भरून येतेच असे नाही ..............! शब्द खूप असर करून जातात एखाद्या मनावर पण मनाचे भाव कुणाला कळतेच असे नाही ..............! न कळणारे , कळून हि न कळणारे असतात आपलेच परंतु त्यांच्या हि मनाची स्थिती समजून घ्यायला कुणी असतेच असे नाही ! संकेत पाटेकर २०.०२.२०१३