सोमवार, ६ जानेवारी, २०१४

माणूसपण...


कुणी आपुलकीनं जवळ घेतं
कुणी प्रेमानं जवळ नेतं
कुणी शब्दांच्या धारेतून
ओल्या वेदनांच जखम देत .

कुणी ' मूर्खाच ' ग्रेड देत
कुणी 'ग्रेट ' म्हणुनी जातं
कुणी क्षणांच्या सोबतीनं
वेड्या मायेच छत देत .

कुणी वाह , कुणी शाब्बास
कुणी कौतुकाची थाप देतं
कुणी मूकपणाने हे सारे क्षण
नजरेत टिपून घेतं

कुणी जीवापाड प्रेम देत
कुणी प्रेमात हरवूनी नेतं
कुणी वेळेच्या संगतीनं
स्वतहाच बदलून जातं

क्षण हे असे , हास्याचे ,
दु:खाचे , प्रेमळ शब्दांचे ,
हळुवार स्पर्शाचे , मायेचे ,
नव्या उत्साहाचे ,
नव्या प्रेरणेचे ,
माणूसपण घडवून देत .

संकेत य पाटेकर
०६.०१.२०१४
सोमवार

भावना मनातल्या
कविता माझ्या !