तुझी आठवण
रात्रभर तुझी आठवण झोपू मला देत नाही दिवसभर तुझा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून हटत नाही... दूर अशी असून सुद्धा समोर माझ्या तू उभी असतेस नजरेला नजर भिडून तू माझ्याशी बोलतं असतेस. जिकडे तिकडे मला आता तुझाच चेहरा दिसू लागलाय वेडा होतंय कि काय मी आता असाच भास मला होऊ लागलाय काम धंदे सोडून मी तुझाच जप चालू केलाय दिवस रात्र तुझ्या नावाचा गजर मी सुरु केलाय. मित्र आता म्हणू लागलेत ह्याच आता काय खर नाही प्रेमात पडला आहे बेटा पुन्हा वर येण्याचा chance नाही संकेत य पाटेकर २६.०८.२०११