मंगळवार, १८ डिसेंबर, २०१२

! सह्याद्री !


! सह्याद्री !
नभा नभातुनी ,
दऱ्या खोऱ्यांतुनी
गर्जितो माझा सह्याद्री !

दिशा दिशांना
साद घालूनी
पुलकित होतो सह्याद्री !

गड किल्ल्यांच्या
रत्नमनी शोभितो
शान आपुला सह्याद्री !

शिवरायांचे , पराक्रमांचे
गुणगान गातो हा
सह्याद्री !

मनी उभरतो,
उरी फडकतो ,
शक्तिस्थळ अपुला
सह्याद्री !

मना मनातुनी
नाद घुमते
शान आपुला सह्याद्री !

कणखर ,रौद्र
भीषण रुप त्याचे
गौरवशाली सह्याद्री !

महाराष्ट्राचा मुकुट
मनी तो ,
वेड आपुले सह्याद्री !


संकेत य पाटेकर
१८.१२.१२
मंगळवार
वेळ दुपार : २:१५

सोमवार, १७ डिसेंबर, २०१२

नशिबातच जे प्रेम नाही..


नशिबातच जे प्रेम नाही
त्या प्रेमासाठी धडपडतो
मनातल्या भावनांना
सतत मी छळतो ........
- - संकेत

प्रेम म्हटल कि ..


प्रेम म्हटल कि ...प्रियकर आणि प्रेयशीच प्रेम
अस प्रत्येक जण गृहीत धरतं
खर तर ते तसं मुळीच नसतं

आई वडील ...बहिण भाऊ ..ह्यांचही
कुठे नातं असतं
ते मात्र कळत नसतं

प्रेम म्हटल्यावर ...प्रियकर आणि प्रेयशीचच
चित्र डोळ्या समोर दिसत
का बर अस होत असतं

प्रेम म्हणजे काही दोन व्यक्तीनसाठीच
मर्यादित नसतं
प्रेम म्हणजे प्रेम असत .......
सर्व नात्यांना ते सेम असतं
- संकेत


भेट घडूनिया


भेट घडूनिया
पुन्हा भेटघडूशी वाटते
तुझ्या प्रेमळ सहवासात
पुन्हा रमून जावेसे वाटते
- संकेत

कुणाला कल्पना हि नसते..


कुणाला कल्पना हि नसते ,
कुणी कुणावर किती प्रेम करत असते ,
कुणाच्या भेटीसाठी , शब्दांच्या प्रेमळ छायेसाठी ,
हे मन क्षणो क्षणी किती विव्हळत असते .
- संकेत


आज खूप आठवण येते तुझी ...


आज खूप आठवण येते तुझी .......
किती दिवस झाले दिवसा वरून दिवस सरले
एक शब्द देखील बोललो नाही , भेटलो नाही .

आज मन घुटमळतय तुझ्या आठवणीने ....
वाटतय बोलावे दोन शब्द तुझ्याशी ,
हसावे तुझ्या संगतीने ...
असावी सोबत तुझी काही क्षण तरी ....
मिळावी प्रेमळ मनाची साथ काही वेळ तरी


मन घुटमळतय तुझ्या आठवणीने ......

वाटत स्वतःहून तू बोलावीस ,
स्वताहून कधीतरी आठवण काढावीस
प्रेमाने विचार पूस कारावीस
शब्दांची गंमत जमावीस

वाटतंय , , पण काहीच घडत नाही
काहीच उत्तर मिळत नाही
मन नेहमीच अस घुटमळत
अशानेच हूर हुरतं, भरकटत

आज खूप आठवण येते तुझी ......


नातं तुझ माझं
संकेत य पाटेकर
१०.१२.१२शुक्रवार, ७ डिसेंबर, २०१२

दिवाळी .....


दिवाळी म्हणजे उधळण पैशाची ,
कपडेलत्ता , भेट वस्तू अशा अनेकानेक खरेदीची

दिवाळी म्हणजे उधळण मुक्त रोषणाईची ..,
आकाशाला हि उजळणारी ....मना मनाला भिडणारी , आनंद देणारी

दिवाळी म्हणजे उधळण आनंदाच्या अनमोल क्षणांची
चिवडा लाडू , करंज्या , चकल्या , शंकरपाळ्या अशा
नाना विविध चविष्ट फराळाची

दिवाळी म्हणजे भेट नात्या गोत्यातील त्या खास व्यक्तींची
बहिण अन भावाची , भाऊबिजेच्या त्या गोड अनमोल क्षणाची
प्रेमाने दिलेल्या त्या भेट वस्तू ची , शुभा शिर्वादांची


दिवाळी म्हणजे मौलिक क्षण आनंदाने न्हाहून निघालेले ....
चहू दिशा पसरलेले ..मना मनात ठसलेले .

संकेत य पाटेकर
१३.११.२०१२
वेळ : सायंकाळ ४:२५


काय हव आहे तुला?


काय हव आहे तुला ?
ज्यावेळी मी तिला हा प्रश्न केला
तिने दिधले उत्तर मजला कि
हवाय तुझा हसरा -आनंदि चेहरा

काय म्हणू , काय उत्तर देऊ
हसूनच मी उत्तरलो
हस्ण्यातच कुणा आहे आनंद
म्हणून हसता हसता हासिलो

खरं आहे ह्या जगी ,अपुल्या मनी
हस्न्यातच कुणा असतो आनंद
काय मागावे , काय द्यावे कुणा ,
हसण्यापलीकडे कुठे आहे आनंद

संकेत य पाटेकर
१४.११.२०१२
बुधवार
वेळ: १:४५ मिनिट , दुपार


भेट घडूनिया ...


भेट घडूनिया
पुन्हा भेटघडूशी वाटते
तुझ्या प्रेमळ सहवासात
पुन्हा रमून जावेसे वाटते
- संकेत

कधी कधी विचार येतो...


कधी कधी विचार येतो ..
का कुणास इतके प्रेम करावे ...
का कुणाच्या वाटेवरती
मन स्वतःचे घुटमळूनि द्यावे
- संकेत

जे नसत तेच हव असत...


जे नसत तेच हव असत
जे हव असत तेच मिळत नसत
मिळून सुद्धा काही गोष्टींच
अपुरेपण जाणत असत
- संकेत
२४ नोव्हेंबर २०१२

नाही आवडत तिला त्रास देणं...


नाही आवडत तिला त्रास देणं
तरीही त्रास मी देऊन जातो
तिच्या रोषाचा (रागाचा) मग मी
एक कारण होवून जातो .

हळ हळत मन तेंव्हा
हृदय हि थर थरत
उगाच बोलून गेलो आपण
म्हणून मन माझ मुरतं


शिक्षा होते तेंव्हा
जेंव्हा ती मजवर रागावते
घायाळ होत मन माझं
जेव्हा चूक माझ्या कडून
अशी घडते

काय करू , काय बोलू
तेंव्हा काहीच सुचेनास होत
मौनबद्ध त्या क्षणी
नकळत ''sorry'' निघून जात

होत हे असंच नेहमी
म्हणून ती हि वैतागते
किती त्या चुका माझ्या
तरीही नेहमीच मला
माफ केले जाते .

आहे हे नातं अस अमूच
प्रेमळ मनाच
हृदयाशी हृदयाचं
धड धड त्या स्पंदनाच
मोकळ्या श्वासेच
मना मनाच
मायेच , प्रेमाच
एका अतूट बंधनाच

संकेत य पाटेकर
२९.११.२०१२
गुरुवार
वेळ : ५ सायंकाळ


मन म्हणत एकाकी ....


मन म्हणत एकाकी
का झुराव कुणासाठी ,
ज्याच्या मनातच नाही
प्रेम नि आपुलकी आपल्यासाठी
त्यांस का म्हणून द्यावी
चावी अपुल्या मनाची

मन म्हणत एकाकी
नको न मिळोत प्रेम
नि आपुलकी
करावे भरभरून प्रेम फक्त आपण
का नि का मागावे उगा काही कुणापाशी

- संकेत
०७.१२.१२

वाटतं कधी एका क्षणी ....


आज सकाळच 'दि'(बहिण ) शी बोलता बोलता तिच्या प्रेमळ अन काळजीवाहू शब्दाने मला माझ्या बालपणात लोटले , आईच ते वात्सल्यरूपी प्रेम , तिचं ते प्रेमाने भरविलेला एक एक घास , तिच्या उबदार कुशीतला तो मऊपणा , सारे नजरेसमोर येऊ लागलं . वाटल कि पुन्हा ते क्षण यावेत , पुन्हा आपण लहान ह्वावं, तिच्या अवती भोवती बागडाव , खेळावं .......अस वाटू लागल .... नि काही शब्द सुचले ते असे ....

वाटतं कधी एका क्षणी
पुन्हा लहान ह्वावं,
लहान होता हळू हळू
मग मोठं ह्वावं

ह्वावं तान्हुल बाळ तिचं,
कडेवर उचलुनी तिन घ्यावं,
इप्सिताच्या गोष्टी करिता ,
एक एक घास तिन भरवावं,

चिवू आली , काऊ आला ,
अस हळूच तिने म्हणाव ,
नजरेला नजर भिडवत अचानक ,
मागे वळून पाहावं

दूर होताच नजरेसमोरून
मोठ्या मोठ्या ने रडावं ,
जवळ घेताच ओठावरले
स्मित हास्य उघडावं

हसावं , हसून रुसाव ,
अस नित्य क्रम ह्वावं
तिच्या संगतीतला एक एक क्षण
खेळत बागडत जावं

वाटतं कधी एका क्षणी
पुन्हा लहान ह्वावं,
तिच्या उबदार मायेच्या कुशीत
आपण निवांत नि गाढ झोपी जावं

वाटतं कधी एका क्षणी
पुन्हा लहान ह्वावं................

संकेत य पाटेकर
०७.१२.१२
शुक्रवार


खरचं म्हणायला किती सोपं असत न्हाई ..


काल एका क्षणी मन विचलित झालं, दुभंगल (होत असं अधे मध्ये ) नि रस्त्याने चालता चालता काही ओळी सुचल्या ..............


म्हणायला खरचं किती सोपं असत
''निस्वार्थ'' प्रेम असाव,
मन मात्र म्हणत एकाकी ,
निस्वर्थात '' नि '' मुळीच नसाव ( इथे आपल्या मनाचा स्वार्थ येतो )

काय म्हणावं ,
काय म्हणाव त्याला ( मनाला )
हृदय अशाने हुरहुरतं ( कापत, थरथरत )
मना मनाच्या द्वंद्व युद्धात , ( तीच मन , माझं मन )
ते बिचारं,
अधिक जोराने धडधडतं

शेवटी होतो एकदाचा
कल्लोळ
नि फुटतो बांध मनाचा
बेभान होतात स्पंदनं
नि रंगच बदलतो प्रेमाचा (अशाने प्रेमा बद्दलचे नि त्या व्यक्तीबद्दल आपले विचार बदलू लागतात )

खरचं म्हणायला किती सोपं असत न्हाई
''निस्वार्थ'' प्रेम असाव..........


संकेत य पाटेकर
०३.१२.१२


जे इतरांना मिळत नाही .....


जे इतरांना मिळत नाही ,
ते मला सहज मिळून जातं,
तरी सुद्धा हे मन माझं,
दुखाचच गुणगान गातं
- संकेत
०५.१२.१२

शनिवार, २४ नोव्हेंबर, २०१२

प्रेयशीची आठवण


कुणास ठाऊक सारखं अस का वाटत राहतं ?
मन माझं तिच्या भोवती
घिरट्या घालत राहतं !

किती हि दूर असो ती
ती माझ्या हृदया जवळच असते
मज संगे चालत असते
मज संगे बोलत असते !

कधी कधी अस वाटतं
तिला प्रत्यक्ष भेटून यावं
चार शब्द बोलून प्रेमाचे
मन हे आपलं हलकं करावं !

स्वप्नामधे हि तिचे दर्शन
रोज मज होत असते
चालून बोलून स्वप्नच ते
प्रत्यक्षात मात्र दिसत नसते !

रस्तोरस्ते जाता येता
अनेक प्रेमवीरांची जोडी दिसते
मग नकळत मला माझ्या
त्या प्रेयशीची आठवण येते !

- संकेत पाटेकर
२६.०३.२०११बुधवार, ३१ ऑक्टोबर, २०१२

शब्द शब्द हे...........


शब्द शब्द हे हसवतात
शब्द शब्द हे रुसवतात
शब्द शब्दांमध्ये कधी
स्वतहा हि अडकतात

- संकेत
१२ ऑक्टोबर २०१२

आठवणीच्या असंख्य........गर्दीत


आठवणीच्या असंख्य
गर्दीत तुझी ठळक
आठवण आहे
हृदयाच्या कुपीत
त्या अनमोल क्षणांची
साठवण आहे

गोड सोनेरी क्षणांची
ती एक नाजूक साजूक
मैफिल आहे
प्रेमाच्या रंगीत छायेची
चित्रफित ती अपुली आहे

आठवणीच्या असंख्य
गर्दीत तुझी ठळक
आठवण आहे
.........

संकेत य पाटेकर
१७.०९.२०१२


नाही झेपत गर्दी ..........


पुरता वैतागलो आता
हि नाही झेपत गर्दी
सकाळ असो वा रात्र ,
ट्रेन ला असतेच नेहमीच गर्दी

झाले हाडे ठिसूळ आता
मन हि आता मरगळले
नको नको तो प्रवास आता
त्या गर्दीने मन ढासळले

जातो वाया वेळ कितीहा
एक एक लोकल सोडूनी
गर्दी नामक गर्दी ती
होते कुठे कमी ती

नाईलाज असतो शेवटी
गर्दीतूनच जावे लागते
ठाणे - अंधेरी प्रवास हा मोठा
लोकल ट्रेननेच करावे लागते

थकले भागले मन हे आता
हि नाही झेपत गर्दी
बघावीच लागेल आता
कुठे जवळपासच
नवी चांगली नोकरी

पुरता वैतागलो आता
हि नाही झेपत गर्दी
सकाळ असो वा रात्र ,
ट्रेनला असतेच नेहमीच गर्दी

- संकेत य पाटेकर
१९ ऑक्टोबर २०१२

आनंदाच्या क्षणी........


आनंदाच्या क्षणी दुख सारे पळून जातात ,
दुखाचे क्षण मात्र आनंद हिरावून घेतात .
जीवनाचे रंग हे असेच बदलत राहतात
कधी सुख कधी दुख
क्रमा क्रमाने येतंच राहतात
- संकेत
२५.१०.२०१२

शुक्रवार, ७ सप्टेंबर, २०१२

मला वेड आहे .........मला वेड आहे .................
रौद्र - भीषण अन काळ्या कातळ कड्यांनी नटलेल्या उंच खोल दरयांनी सजलेल्या
त्या सह्याद्रीचं

मला वेड आहे .................
इतिहासाचा अमुल्य ठेवा जपणारया आपल्या स्वराज्यातील गड-किल्ल्याचं

मला वेड आहे .................
निसर्गातील विविधरूपी नवंलाईच.....

मला वेड आहे .................
वाचनाचं....आपल्या वाचन संस्कृतीचं

मला वेड आहे .................
नात्यातल्या त्या गोड प्रेमाचं ...आणि त्या अनमोल क्षणाचं

मला वेड आहे .................
तुझं ...तुझ्यातल्या सप्त गुणाचं अन प्रेमळ मनाचं ...!!!!!!!!!!!!!!!!!!!!!


संकेत य पाटेकर
०८.०९.२०१२

भावना मनातल्या
कविता माझ्या !!

मंगळवार, ३ जुलै, २०१२

पाउस........


पाउस........

हवा हवासा वाटणारा पाउस ,
कधी कधी नकोसा वाटतो ,
ऑफिस ला निघतानाच हा
धो - धो का बरसतो ?

छत्री असते जवळ तरी
उपयोग तिचा काहीच नसतो
वाऱ्यासंगे डोलणारा पाउस
आपल्याच धुन्धीतच असतो

दिशा दिशा हा धुंडाळतो
पकडा पकडीचा खेळ जणू खेळतो
छत्री असो वा रेनकोट हा मात्र
पूर्णतः भिजवितो .

हवा हवासा वाटणारा पाउस ,
कधी कधी खरच नकोसा वाटतो ,
ऑफिस ला निघतानाच हा
धो - धो का बरसतो ?


संकेत य पाटेकर
०४.०७.२०१२कल्पनेतली ती...


कल्पनेतली ती ...

ती म्हणजे गुलाबाची नाजुकशी पाकळी
ती म्हणजे हृदयातील स्पंदनाची साखळी
ती म्हणजे पावसाळ्यातल्या सरीतली एक सर
ती म्हणजे थंडीतल्या गारव्याची एक झळ

ती म्हणजे गायनातील एक स्वरबद्ध तरंग
ती म्हणजे मनातल्या भावनाचे विश्वरुपी अंग
ती म्हणजे श्वासो श्वासातला एक दीर्घ श्वास
ती म्हणजे कल्पनेतल्या विश्वाची एक प्रेमळ आस

ती म्हणजे समुद्रातुनी उटलेली लाटेवरची एक लाट
ती म्हणजे घाटावरची वेडी वाकडी वळणाची वाट
ती म्हणजे नजेरेशी लपंडाव खेळणारी एक नयनपरी
ती म्हणजे स्वप्नातली माझ्या एक स्वप्न सुंदरी

संकेत य पाटेकर
०३.०.०२०१२


सोमवार, २ जुलै, २०१२

जे दिसत तसं मुळीच नसत ...


जे दिसत तसं मुळीच नसत
आपल मन नेहमीच फसतं
चूक काय बरोबर काय
समजल तरी कळत नसत
कळलं तरी उशिरा कळत
मन भावनेच्या अधिपत्याखाली
तोपर्यंत पूर्णतः जखडलेले असत
- संकेत

सुखाची व्याख्या


दुसऱ्यांचा विचार करण्यातच अर्धे आयुष्य
निघून जाते
स्वताहाचे पंख मात्र जमिनीवरच
फडफडत राहते
उडण्याची ताकद ती हळू वार
क्षीण होत जाते
आयुष्याच्या सुखाची व्याख्याच
बदलून जाते

संकेत य पाटेकर


बुधवार, २० जून, २०१२

वेड्याहुनी वेडा मी

वेड्याहुनी वेडा मी 
एक निसर्ग वेडा मी 
सह्याद्रीतल्या दर्या- खोर्यातुनी 
भटकणारा एक भटक्या मी

वेड्याहुनी वेडा मी
एक दुर्ग वेडा मी
सह्याद्रीतल्या दर्या- खोर्यातुनी
भटकणारा एक भटक्या मी

वेड्याहुनी वेडा मी
एक पुस्तक वेडा मी
कथा , कादंबर्या , चरित्रांचा
ललित लेखनाचा ,
आवडत्या लेखकांचा
एक वेडा वाचक मी

वेड्याहुनी वेडा मी
एक काव्य वेडा मी
कवितेतुनी भावनांना
शब्दात उतरविणारा एक
निर्मल कागद मी

वेड्याहुनी वेडा मी .....
एक निसर्ग वेडा मी

संकेत य पाटेकर
२०-०६.२०१२
बुधवार


गुरुवार, १४ जून, २०१२

निसर्गाने रंग उधळले ....


निसर्गाने रंग उधळले
वाऱ्यांसंगे नभ दाटले
हिरवाईचा होऊनी स्पर्श
डोंगर दऱ्या नट- नटले !

काळ्या - लाल मातीचा स्पर्श
चिखलातुनी पाय चालले
वर ढगाआड नभांगातुनी
इथे थेंबे थेंबे तळे साचले !

वेड्या वाकड्या वाटेने
इथे नदी ओढे अन झरे वाहती
खळखळाट  नाद मृदुन्गाने
वृक्ष वेली - पक्षी पाखरे नाचती !

बेहोष- बेधुंद होवुनी मी
पाहत असे चमत्कार हे सारे
निसर्गाचे रूप असे हे
भुलती माझे दुख सारे
भुलती माझे दुख सारे

कविता कशी वाटली ते नक्की सांगा .......

भावना मनातल्या
कविता माझ्या !!

संकेत य पाटेकर
१५.०६.२०१२
शुक्रवार


शुक्रवार, ८ जून, २०१२

पहिला पाऊस, पहिली सर ....


पहिला पाऊस, पहिली सर
पहिल्या सरीतला , मृदुवाल गंध
गंधातुनी उमटलेला,आनंदी तरंग ,
तरांगातुनी भिजलेले,ते ओलेचिंब अंग
अंगावरुनी नितळलेले,मनाला स्पर्शलेले
ते पाउस थेंब
पहिला पाऊस पहिली सर ................

पहिला पाऊस , पहिली ओढ
त्या ओढीतले निशब्द बोल
अंगावरील सरींचा हलकासा जोर
मनातील भावनांची भिजण्याची ती ओढ
पहिला पाऊस पहिली सर ................

पहिला पाऊस , पहिली आठवण
पहिल्या सरीतली ती गोड साठवण
आठवणीतल्या साठवनितले
ते अनमोल क्षण
पहिल्या पाउसातले, रिमझिमत्या सरीतले,
ओलेचिंब आम्ही दोघेजण
ओलेचिंब आम्ही दोघेजण
पहिला पाउस , पहिली सर ....................


संकेत य पाटेकर
०९.०६.२०१२
शनिवारबुधवार, ६ जून, २०१२

नाही कळणार कुणाला ....

नाही कळणार
कुणाला
कसा मी असामी ?
नाही कळणार
कुणला
प्रेमाचा सागर मी
नाही कळणार
कुणाला
वाटेतला गारवा मी
नाही कळणार
कुणाला
नात्यातला गोडवा मी
नाही कळणार
कुणाला
डोळ्यातला दवसागर मी
नाही कळणार
कुणाला
हास्यातील हास्य मी
नाही कळणार
कुणाला
कसा मी असामी
नाही कळणार कुणाला ...........

संकेत य पाटेकर
२६.०५.२०१२
शनिवार

येतोय तो...

येतोय तो ..................
दूर अंतरीतून ...काळ्या पडद्याआड
लखलखत्या प्रकाशित शुद्ध निर्मल तेजोमय अंगाने ...
स्वच्छंदी सुगंधी लहरी वायू तरंगाने
प्रेमाच्या लगबगीने ...मायेच्या उत्कंठेने
थंड शीतल गारव्या संगे ...
येतोय तो .............

येतोय तो .............
आ वासून बसलेल्या डोळे नभाकडे
असलेल्या गोर गरिबांसाठी
येतोय तो ...

लहानग्यांच्या प्रेमापोटी
त्यांचा ओसंडत्या आनंदासाठी
येरे येरे पावसाच्या नृत्यांगनासाठी
हळूच पावलांनी
येतोय तो ....

वृक्षवेलींना ..पाने फुलांना
पक्षी पाखरांना
स्वरबद्ध तरंग लह्र्रीतून चिंब भिजवायला
येतोय तो ..

रखरखत्या उन्हाने ....झगझगत्या आगीने
काळवंडलेल्या , कोरड्या शुष्क, मातीला
आपल्या प्रेमळ स्पर्शाने ...
चैत्यन्य रूप परिधान करण्यास
पुन्हा येतोय तो ...

येतोय तो ......
पाउस

भावना मनातल्या
कविता माझ्या !!

संकेत य पाटेकर
०६.०६.२०१२

कधी कधी ....

कधी कधी मन स्वताहालाच समजू पाहतो
का म्हणून आपण तिला दु:ख द्यावे ?
का म्हणून आपण तिच्या मनाशी खेळावे ?

एकीकडे तिच्या सुखासाठी देवाकडे
साकडे घालावे
अन एकीकडे रागातून शाब्दिक घाव द्यावे
का बर अस घडावे ?
कळतंय ...समजतंय तरीदेखील मन तिथेच
पुन्हा वळतंय

चुकतोय आपण कुठेतरी हि जाणीव होत नाही
असेही नाही
पण मनाला ह्या समजावणार तसं दुसर-तिसर
कुणीच नाही !

- संकेत
०२.०६.२०१२

बुधवार, ३० मे, २०१२

तुझं माझं नातं ...

नातं .........एक अनमोल नातं
नांत म्हटल कि त्यात आला जिव्हाळा , ममत्व , प्रेम , विश्वास , सहवास ,अबोला , प्रमळ राग आणि खट्याळ मस्ती .
नातं म्हणजे एक रेशीम गाठ असते ...जन्मोजान्माची.............नांत म्हणजे

बघा वाचा माझी हि कविता .......कशी वाटली ते नक्की सांगा ..!
तुझ माझ नातं .................

तुझं माझं नातं
जस समुंदराच्या
पाण्यातल आकाशाच
निळेशार छत

तुझं माझं नातं
जस पावसाच्या सरी मधलं
आनंदाच नाच

तुझं माझं नातं
जस फुलांच्या पाकळ्यान मधला
मधाचा मधुर मधरस

तुझं माझं नातं
जस आंब्याच्या वनराईत
आब्यान्चाच सुगंधित रस

तुझ माझ नातं
जस चांदण अन चंद्राच
शीतल सौम्य प्रकाश

तुझं माझं नातं
जस तलावाच्या तळाशी
रुतलेल कमळाच देठ

तुझं माझं नातं
जस वाऱ्याच्या स्वरलहरी ने
शहारलेल गवताचं पातं

तुझं माझं नातं
जस शब्दांनी शब्दांना
दिलेला प्रेमळ प्रतिसाद

तुझं माझं नातं
त्या ईश्वराचीच
एक अनमोल भेट

तुझं माझं नातं
म्हणजे जन्मा जन्माची ची
प्रेमळ, अतूट विश्वसणीय अशी रेशीम गाठ

संकेत य पाटेकर
३०.०५.२०१२
मंगळवार

आठवणी ह्या आठवणी ..

हळूच वाऱ्याचा झुळूक अंगावर यावा .....अन मनाला हुरहुरी यावी
तशा ह्या आठवणी ... हळूच कुठून येतात. .. अन मनाला आपल्या जंजाळ्यात पार गुंतवून ठेवतात काही क्षण .


आठवणी ह्या आठवणी
ताज्या- जुन्या ,नवं - नवीन
ह्या आठवणी
दिशा चुकवून कुठूनही
भुलवुनी येती
ह्या आठवणी
मनी रमती मनी खेळती
हासवे - आसू गाळती
ह्या आठवणी
प्रवास दुनियाचा करुनी
सुख- दुखाचा परिपाठ
गाती ह्या आठवणी
ह्या आठवणी ....
आठवणी ह्या आठवणी
ताज्या- जुन्या ,नवं - नवीन
ह्या आठवणी

संकेत य पाटेकर
२९.०५.२०१२
मंगळवारशनिवार, १९ मे, २०१२

का म्हणून दुख ओढावून घ्यायचे ...........................

का म्हणून दुख ओढावून घ्यायचे ?
का म्हणून 'मन' दुखाच्या डोहात ढकलायचे ?
नशिबातच ज्या गोष्टी नाहीत
त्यांना का म्हणून इतक महत्व द्यायचे

झाल गेल सर्व आता विसरायचे
आयुष्य हे भरभरून जगायचे
दुसऱ्यांच हित मात्र जपायचे
हसता हसता हे जीवन
एकट्यानेच जगायचे

नाही कुणीच आपल तरी
आपण मात्र इतरांसाठीच व्हायचं
हृदयातल्या नक्षीदार कागदावर
आठ्वणींच ठस उमटवायच

आयुष्य हे भरभरून जगायचं
झाल गेल सर्व विसरायचं
दुसऱ्यांच हित मात्र जपायचं
हसता हसता हे जीवन
एकट्यानेच जगायचं

संकेत य पाटेकर
१९.०५.२०१२
शनिवार
वेळ:- दुपार : १:३०
 

शनिवार, ५ मे, २०१२

नाही काही मागत तुझ्याकडून

नाही काही मागत तुझ्याकडून
मला फक्त तुझ प्रेम हवंय
क्षितिजाकडे उंच झेप घेताना
सोबत फक्त तुझी हवेय

नाही भेटन , नाही बोलन
हृदयात तुझ्या स्थान हवंय
आठवणींच्या असंख्य गर्दीत
एक आठवण म्हणून माझ
नाव हवंय

नाही काही मागत तुझ्याकडून
मला फक्त तुझ प्रेम हवंय...

संकेत य पाटेकर
०५.०५.२०१२
शनिवार

गुरुवार, ३ मे, २०१२

असावा एक प्रेमळ सहवास ...


असावा एक प्रेमळ सहवास ,
त्या सहवासात मी मलाच
विसरून जाव,
असावा एक प्रेमळ स्पर्श
त्या स्पर्शात सारे दु:ख
विरघळून जाव

असावा ते गोड अन
गोजिरवाणे शब्द,
त्या शब्दात मी मंत्रमुग्ध
होवून जाव

असावी एक अतूट साथ ,
जिच्या सोबतीने आयुष्य हे
बहरून निघावं

असावी एक प्रेमळ -सोज्वळ -मनमिळावू
अशी 'ती'
तिच्या सोबत मी
विवाह बद्ध होऊन जाव

संकेत य पाटेकर
०३.०५.२०१२

गुरुवार, १९ एप्रिल, २०१२

'अजून थोड वेळ दे मला'


'अजून थोड वेळ दे मला'
तीच हे वाक्य अजून मनी घुमतंय
तिच्या डोळ्यातील कारुण्यभाव
नजरेसमोर उरतय

थरथरते ओठ तिचे
ओलेचिंब शब्द ते
अश्रुंचे थेंब अन
कारुण्यरूपी भाव ते

पाहताच तिच्याकडे
हृदय हि पाणावले
आज माझ्या मुळे
अश्रू तिने वाहिले

वाटले वाईट
मनास फार लागले
आज माझ्यामुळे
डोळे तिचे पाझरले

क्षण किती निष्ठुर हे
का कसे कठोर होतात
का कुण्या प्रेमळ मनास
बंदिस्त करू पाहतात

हास्य जीवन असता
परिस्थिती घाव घालते
आनंदमय वातावरणात
मग दुखाचेच निखारे वाहते

असले असे तरीही
न डगमगणारे मन ते तिचे
असल्या परिस्थिती पुढे
झुकेलच कसे ते

एकच मागणी आहे तिची
साथ तुझी राहू दे
परिस्थितीशी झुंजायाला
थोडा वेळ मला अजून दे

न समजणारे माझे मन
नेहमीच गैसमज करून घेत असे
भेटी-गाठी , बोलन टाळते म्हणून
नेहमीच तिच्याशी भांडत असे .

आज प्रत्यक्ष भेटीत मात्र
सारे काही उमगले
माझ्या मनास खर काय ते
आज कुठे कळले

एक मागणी त्या ईशकडे
सगळ काही ठीक कर
तिचे जीवन आनंदी
अन
सुखद कर !!

संकेत य पाटेकर
दि: १९.०४.२०१२
वार : गुरवार

बुधवार, २८ मार्च, २०१२

!! एक मागण तुझ्याकडे ..!!


!! एक मागणं तुझ्याकडे ..!!

कोणतेही नातं असो ...देवा ,
अंतर त्यात कधी पाडू नकोस

अंतर पाडण्याइतपत दुर्बुद्धी
मज कधी देऊ नकोस

मेलो तरी बेहत्तर पण
प्रेम माझं कमी होऊ देऊ नकोस

मेल्यावर ही आठवणी माझ्या
विसरून त्यांना कधी देऊ नकोस

संकेत य पाटेकर
०७.१२.२०१२
मंगळवार

एकांतवास ............


काय कुणास ठाऊक
हल्ली एकट एकट वाटत
सोबत कुणीच  नाही
असंच सारख भासत

नात्यातले बंधन देखील
तुटल्या सारखेच वाटतात
दूरवर निघून जावे तसे
सारेच मला भासतात

सहवास ज्यांचा हवा
तेच दूर जाऊ पाहतात
मनाला माझ्या का असे
ते एकटे करू पाहताहेत

घुटमळत मन आता
अशा ह्या एकांतात
खरच नको मला
असा हा एकांतवास

खरच नको मला
असा हा एकांतवास ...!!


संकेत य पाटेकर
२१ फेब्रुवारी २०१२
मंगळवार
वेळ सकाळचे  :- ११:३५

ज्या ज्या वेळी तुझी भेट घडते ...........


ज्या ज्या वेळी तुझी भेट
घडते
नजर तुझ्या डोळ्यावर
स्थिरते
डोळ्यातील त्या बुबुलांमध्ये
मज दु:खाचेच निखारे
दिसते

चेहर्याच्या त्या हास्यामागे
दुख तुझे ते लपून राहते
एकांतपणात मात्र सारे
आसू मार्गे वाहत जाते

असतो मी समोर तरीही
दु:ख तुझे ते पाहत राहतो
दु:खाच्या जलसागरात  त्या
स्वताहा मी बुडून जातो

असते मनी खूप माझ्या
हसत-खेळत तुला पाहावं
तुझ्या त्या गोड
हास्याने जीवन तुझ
फुलाव

तुझ्या दुखाचे भार सारे
मज खांद्यावर हळूच घ्यावं
दुखाच्या ह्या जंजाळातून
अलगद तुला बाहेर काढव

असली मनी इच्छा अशी
तरीही
हाती आपुल्या काहीच नसते
निसर्गाच चक्र सारे
जीवन हे असेच असते
जीवन हे असेच असते

संकेत य पाटेकर
०२.०२.२०१२
गुरुवार

कुणीतरी हव आहे.....कुणीतरी हव आहे
माझ मन जाणून घेणार,

कुणीतरी हव आहे ,
माझ मन समजून घेणार,

कुणीतरी हव आहे,
नेहमी साथ मला देणार,

कुणीतरी हव आहे,
माझ्यावर खूप प्रेम करणार

-संकेत

गुरुवार, २२ मार्च, २०१२

मन नाराज आहे तुझ्यावर

मन नाराज आहे तुझ्यावर
तुझ्या त्या चिडचिडपनावर,
तुझ्या त्या अनियंत्रित रागावर
तुझ्या त्या अबोलपणावर

मन नाराज आहे तुझ्यावर

तुझ्या अंतर्मनात उठलेल्या
त्या असंख्य अशा वादळी
विचारांवर ,
तुझ्या त्या एकटक शांत
बसण्यावर,
तुझ्या त्या दु:खी मनावर

मन नाराज आहे तुझ्यावर

तुझ्या मनात उठ्नारया
तमाम प्रश्नांवर
तुझ्या त्या न मिळणारया
अनेक उत्तरांवर
तुझ्या त्या होणाऱ्या त्रासावर

मन नाराज आहे तुझ्यावर

तुझ्या अशा ह्या स्वभावावर
तुझ्या गर्दीत असूनही
एकटे असण्यावर
तुझ्या एकाकीपणावर

मन नाराज आहे तुझ्यावर

तुझ्या हिरमुसल्या
नाराज अशा चेहऱ्यावर
तुझ्या चेहर्यावर उमटलेल्या
त्या असंख्य चिंता - आणि
दुखमय जीवनावर

मन नाराज आहे तुझ्यावर

खर हे जीवन ना
हसता हसता जगायचं असत
सोबत कुणी नसल तरी सोबती
आपल आपण व्हायचं असत

प्रेम मिळो अथवा ना मिळो
प्रेम मात्र आपण करायचं असत
प्रेमळ मनाने प्रेम हे हळूच
फुलवायचं असत

दुख अपार आहेत पण
थोड आपण सावरायचं असत
हसता हसता दुसर्याला
नकळत हसवायचं असत

-श्रद्धा (बहिण )
-संकेत य पाटेकर
०७.०१.२०१२
शनिवार

मी आणि माझी बहिण श्रध्दा , आम्हा दोघांच्या काही कडव्यांनी मिळून साकार झालेली हि कविता.
हि कविता तशी जानेवारीच्या पहिल्या आठवड्या मधेच लिहून झाली होती पण ती काही कारणास्तव मला पोस्ट नाही करता आली ...
ती आज इथे हि कविता मी पोस्ट करत आहे .
खालील असलेल्या इमेज मध्ये तिच्या हस्ताक्षरात लिहिलेले तिच्या काही ओळीमंगळवार, २० मार्च, २०१२

चला गड्यांनो ...


चला गड्यांनो
महाराष्टाचे गुणगान आपण गाऊ
सह्याद्रीच्या या उंच शिखरावर
पाउल आपुले ठेवू

जोडूनी दोन्ही हात
मस्तक देवीपुढे ठेवू
कळसू आई चे आशीर्वाद
घेउनी या दर्या खोर्यातुनी फिरू

ठेउनी पाउल या शिखरावरती
विजयी , स्वरबद्ध लहरी वाहू
वारयासंगे बोल अपुले
ह्या दऱ्या खोर्यातुनी घुमवू

पाहुनी रांगा ह्या सह्याद्रीच्या
भान आपुले हरवू
सह्याद्रीतील इतिहासाचे
गड-किल्ल्याचे पान आपण उघडू

पाहुनिया सारा हा इतिहास
नतमस्तक त्यापुढे होऊ
सह्याद्रीतील ह्या राजाचे
अपुल्या छत्रपती शिवरायांचे
चला स्मरण आपण करू

सिंह गर्जना देऊन ह्या
दिशा सार्या उजळवू
महाराष्टाचे , छत्रपती शिवरायांचे
चला गुणगान आपण गाऊ

चला गड्यांनो ...


संकेत य पाटेकर
१९.०३.२०१२

दोन आठवड्यापूर्वी कळसुबाई ह्या महाराष्ट्रातील सर्वात उंच अशा शिखरावर जाऊन आलो ,
त्यानिमित्त त्याबद्दल काही दिवसांपूर्वी लेखन सुरु केल होत . माझ्या ब्लोग साठी . ..
ते लिहित असताना ....हि छोटीसी साधी - भोळी कविता सुचली ....ती तुमच्या समोर सादर करीत आहे.
कशी वाटली ते नक्की सांगा ......!!

गुरुवार, १५ मार्च, २०१२

कोण कुणाच नाही ...

नाही ह्याचा नाही त्याचा
नाही मी कुणाचा
मी आहे माझा मी आहे माझाच
आहे मी स्व:ताचा

कुठल नातं , कसल नातं
इथे कोण कुणाच नाही
स्वता:हा साठी जगतो आपण
बस्स दुसर काही नाही

घडतात भेटी ,
जुळतात नाती
समाधानी आपण पावेतो
प्रेम ओसरताच क्षणी
हळूच दूर फेकलो जातो

प्रेम म्हणजेच जीवन
प्रेम म्हणजेच सार काही
असं असता हि ?
का तुटतात ह्या अनमोल नाती

स्व:ताहा मध्ये झोकून
पाहिलं कि कळत सार काही

स्वार्थापायी जगतो आपण
बस्स दुसर काही नाही.
दुसर काही नाही.

संकेत य पाटेकर
१६.०३.२०१२
शुक्रवार

बुधवार, ७ मार्च, २०१२

!! नकळतच !!


नकळत आपण
कुणाच्या आयुष्यात
कधी येऊन जातो अन
प्रेमाच्या गर्द छायेत
नकळत हरवून हि जातो.

नकळत नात्याचं अतूट
बंधनात आपण गुंतले जातो
अन नात्यात्तील सुगंधित ,
प्रफ्फुल्लीत अन सुवासिक
वातावरणात चैतन्यमय
होवून जातो.

कळत नकळतच
काही नाती
जुळल्या जातात अशा
अन आपुलकी, प्रेम, सदभावना
ह्यांनी मन हळूच बहरून जात.

संकेत य पाटेकर
०७.०३.२०१२
!!भावना मनातल्या
कविता माझ्या !!

बुधवार, १८ जानेवारी, २०१२

एकटा मी .....एकटा असा...

एकटा मी
एकटा असा एकटाच राहिलो
मार्ग आपला शोधिता
वाट हि हरविलो

जाणले तेंव्हा आम्ही
कि एकटे होतो तिथे
चालणे होते आम्हा
मागे ना आता हटने

तुडविता पायवाटा
पाय माझे पोळले
काट काटकयांनी नी ह्या
रक्त माझे वाहिले

थांबलो क्षणभर मी
अश्रू हे ओघळले
होती जाणीव हि
एकटे आम्ही तिथे

एकटा मी
एकटा असा एकटाच राहिलो
मार्ग आपला शोधिता
वाट हि हरविलो

संकेत य पाटेकर
१८.०१.२०१२
बुधवार

मन म्हणाले दुसर्या मनाला ...

मन म्हणाले दुसर्या मनाला
का करतोस तू इतका विचार
का होतोस तू इतका बैचेन ?

मन म्हणाले पहिल्या मनाला
तुला नाही कळणार
व्यथा माझी
तुला नाही कळणार
दु:ख ते माझे

माझे मलाच ठाऊक
कसा मी जगतोय
माझे मलाच ठाऊक
किती खडतर आयुष्य
मी काढतोय

नाही सांगता येणार तुला
दुख हे माझे
आणि का बर ते मी सांगाव ?
उगाच तुला का बर दुखवाव

मन म्हणाले दुसर्या मनाला
अरे , वेड्या '
मना मनाची व्यथा
हि मनालाच आपल्या कळणार ना !
दुखी असे राहून राहून
दुख काय ते मिटणार का ?

न बोलताच बरंच कळत रे
कारण मन हे एका
मनालाच कळत
तुझ अस दुख पाहून
माझ मन हळहळत

क्षणिक असत रे सर्व
क्षणात सार बदलत
निसर्गाचा नियमच आहे
जे जात ते पुन्हा
नव्याने परत येत

म्हणून
दुखी अस नको राहूस
जरा गोड गोड हस पाहू

संकेत य पाटेकर
१३.०१.२०१२
शुक्रवार

खंत वाटते मनास ....

खंत वाटते मनास
का करतेस इतका विचार ?
करुनी इतका विचार
का टप टपते हे अश्रू थेंब '?
थेंबे रुपी हे पाणी
मग ओघळते गालावरुनी
आठवणीतले ते क्षण
वाहते असे अश्रू मधुनी

आठवणीतले ते क्षण
वाहते असे अश्रू मधुनी

संकेत य पाटेकर
०३.०१.२०१२
मंगळवार

कधी कधी वाटत ...

कधी कधी वाटत
नुसतंच आपल शांत
बसून राहावं
आपल्या लोकांपासून
खूप दूर निघून जाव
एकटक राहावं
आठवणीत हरवावं
आठवणीत हसावं
हसता हसता रडावं

कधी कधी वाटत
का कुणावर प्रेम कराव ,
का कुणा साठी धडपडाव
का कुणाच्या भावनांना दुखवाव
का स्वतहा दुखी व्हावं

कधी कधी वाटत
मुक्त पणे हे जीवन जगावं
वार्या प्रमाणे मुक्त फिरावं
मधेच शांत मधेच लहरी व्हावं

संकेत य पाटेकर
२९.१२.२०११
गुरुवार

!! जीवनाचा धडा !!

धनुष्यातील बाण जसा
सर्रकन सोडावा ना
तसे तिचे शब्द
वाऱ्या वेगाने माझ्या
काळजावर येऊन धडकले
अन हृदयाला माझ्या
तीक्ष्ण धारेने छेद करून गेले

क्षणभर विव्हळलो मी
त्या शाब्दिक घावेने
वेदना झाल्या
अपार त्या शब्दाने

बोलता बोलता बोलून गेली
ती खूप काही
जे तिच्या मनाला
अजिबात पटलं नाही

कारण हि तसंच होतं म्हणा
जीवनातल्या पटावर
माघार मी घेत होतो
इकडून तिकडे नुसताच
आपला पळ मी काढत होतो

चुकीच्या ठिकाणी
चुकीचंच वागत होतो
चूक काय आहे ?
हे माहित असून
गप्प मी बसत होतो.

पटणार तरी कसं तिला
माझं असं वागणं
चूक अन बरोबर काय
हे ज्ञात असून माझं
असं गप्प - गप्प राहाणं

बोलली मग बरंच काही ती
जे अगदी योग्य होतं
माझ्या अशा वागण्याला
असंच काही हवं होतं

एक एक शब्द तिचा
काळजाला भिडत होता
जीवन कसं जगावं
हा धडाच जणू मला
मिळत होता

जीवन कस जगावं
हा धडाच जणू मला
मिळत होता !!

संकेत य पाटेकर
२३.१२.११
वेळ: दुपारी १२:३० मिनिट
वार : शुक्रवार

'आपलेपणचा हुंदका' तेवढा सहज निघतो रे ...

सहजह 'आठवण' यावी असं काही नसतं रे 'आपलेपणचा हुंदका' तेवढा सहज निघतो रे ...! विसरत नाही बघ तसं कुणी कुणालाच असे 'हृद...