घराच्या चौकटी मधून म्हणा , किंव्हा रस्त्याने जाता येता म्हणा ..उंच निळ्या आकाशी 'घारी' घरट्या घालताना दिसत असतात ... तेंव्हा आपलं 'मन' हि कल्पकतेचे कल्पितपंख लावून उंच आकाशी झेपावते ...... त्या अर्थी हि माझी कविता ... त्या उंचउडल्या घारीसारखे स्वच्छंदी होवुनी विहरावे ह्या निळ्याभोर नभांगातुनी अवघे हे विश्व पहावे ! ते राकट-कणखर सह्यकडे , ते वेडे वाकडे घाट दरे, ते रुप गोजिरे क्षितीजाचे डोळ्यात साठुनी घ्यावे ! त्या उंचउडल्या घारीसारखे स्वच्छंदी होवुनी विहरावे ! तो रंग हिरवा रानाचा तो गंध सुमधुर पुष्पांचा तो मंद झुळका वाऱ्याचा श्वासात कोंडूनी घ्यावे ! त्या उंचउडल्या घारीसारखे स्वच्छंदी होवुनी विहरावे ते गीत अंतरी जगताचे नर्तन वर्तन पाखरांचे बैसुनी टोकावरति कुठे हरखुनी त्यात निघावे ! त्या उंचउडल्या घारीसारखे स्वच्छंदी होवुनी विहरावे ह्या निळ्याभोर नभांगातुनी अवघे हे विश्व पहावे ! - संकेत य पाटेकर १५.०९.२०१४