पोस्ट्स

डिसेंबर, २०१२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

! सह्याद्री !

इमेज
! सह्याद्री ! नभा नभातुनी , दऱ्या खोऱ्यांतुनी गर्जितो माझा सह्याद्री ! दिशा दिशांना साद घालूनी पुलकित होतो सह्याद्री ! गड किल्ल्यांच्या रत्नमनी शोभितो शान आपुला सह्याद्री ! शिवरायांचे , पराक्रमांचे गुणगान गातो हा सह्याद्री ! मनी उभरतो, उरी फडकतो , शक्तिस्थळ अपुला सह्याद्री ! मना मनातुनी नाद घुमते शान आपुला सह्याद्री ! कणखर ,रौद्र भीषण रुप त्याचे गौरवशाली सह्याद्री ! महाराष्ट्राचा मुकुट मनी तो , वेड आपुले सह्याद्री ! संकेत य पाटेकर १८.१२.१२ मंगळवार वेळ दुपार : २:१५

नशिबातच जे प्रेम नाही..

नशिबातच जे प्रेम नाही त्या प्रेमासाठी धडपडतो मनातल्या भावनांना सतत मी छळतो ........ - - संकेत

प्रेम म्हटल कि ..

इमेज
प्रेम म्हटल कि ...प्रियकर आणि प्रेयशीच प्रेम अस प्रत्येक जण गृहीत धरतं खर तर ते तसं मुळीच नसतं आई वडील ...बहिण भाऊ ..ह्यांचही कुठे नातं असतं ते मात्र कळत नसतं प्रेम म्हटल्यावर ...प्रियकर आणि प्रेयशीचच चित्र डोळ्या समोर दिसत का बर अस होत असतं प्रेम म्हणजे काही दोन व्यक्तीनसाठीच मर्यादित नसतं प्रेम म्हणजे प्रेम असत ....... सर्व नात्यांना ते सेम असतं - संकेत

भेट घडूनिया

भेट घडूनिया पुन्हा भेटघडूशी वाटते तुझ्या प्रेमळ सहवासात पुन्हा रमून जावेसे वाटते - संकेत

कुणाला कल्पना हि नसते..

इमेज
कुणाला कल्पना हि नसते , कुणी कुणावर किती प्रेम करत असते , कुणाच्या भेटीसाठी , शब्दांच्या प्रेमळ छायेसाठी , हे मन क्षणो क्षणी किती विव्हळत असते . - संकेत

आज खूप आठवण येते तुझी ...

इमेज
आज खूप आठवण येते तुझी ....... किती दिवस झाले दिवसा वरून दिवस सरले एक शब्द देखील बोललो नाही , भेटलो नाही . आज मन घुटमळतय तुझ्या आठवणीने .... वाटतय बोलावे दोन शब्द तुझ्याशी , हसावे तुझ्या संगतीने ... असावी सोबत तुझी काही क्षण तरी .... मिळावी प्रेमळ मनाची साथ काही वेळ तरी मन घुटमळतय तुझ्या आठवणीने ...... वाटत स्वतःहून तू बोलावीस , स्वताहून कधीतरी आठवण काढावीस प्रेमाने विचार पूस कारावीस शब्दांची गंमत जमावीस वाटतंय , , पण काहीच घडत नाही काहीच उत्तर मिळत नाही मन नेहमीच अस घुटमळत अशानेच हूर हुरतं, भरकटत आज खूप आठवण येते तुझी ...... नातं तुझ माझं संकेत य पाटेकर १०.१२.१२

दिवाळी .....

इमेज
दिवाळी म्हणजे उधळण पैशाची , कपडेलत्ता , भेट वस्तू अशा अनेकानेक खरेदीची दिवाळी म्हणजे उधळण मुक्त रोषणाईची .., आकाशाला हि उजळणारी ....मना मनाला भिडणारी , आनंद देणारी दिवाळी म्हणजे उधळण आनंदाच्या अनमोल क्षणांची चिवडा लाडू , करंज्या , चकल्या , शंकरपाळ्या अशा नाना विविध चविष्ट फराळाची दिवाळी म्हणजे भेट नात्या गोत्यातील त्या खास व्यक्तींची बहिण अन भावाची , भाऊबिजेच्या त्या गोड अनमोल क्षणाची प्रेमाने दिलेल्या त्या भेट वस्तू ची , शुभा शिर्वादांची दिवाळी म्हणजे मौलिक क्षण आनंदाने न्हाहून निघालेले .... चहू दिशा पसरलेले ..मना मनात ठसलेले . संकेत य पाटेकर १३.११.२०१२ वेळ : सायंकाळ ४:२५

काय हव आहे तुला?

इमेज
काय हव आहे तुला ? ज्यावेळी मी तिला हा प्रश्न केला तिने दिधले उत्तर मजला कि हवाय तुझा हसरा -आनंदि चेहरा काय म्हणू , काय उत्तर देऊ हसूनच मी उत्तरलो हस्ण्यातच कुणा आहे आनंद म्हणून हसता हसता हासिलो खरं आहे ह्या जगी ,अपुल्या मनी हस्न्यातच कुणा असतो आनंद काय मागावे , काय द्यावे कुणा , हसण्यापलीकडे कुठे आहे आनंद संकेत य पाटेकर १४.११.२०१२ बुधवार वेळ: १:४५ मिनिट , दुपार

भेट घडूनिया ...

भेट घडूनिया पुन्हा भेटघडूशी वाटते तुझ्या प्रेमळ सहवासात पुन्हा रमून जावेसे वाटते - संकेत

कधी कधी विचार येतो...

कधी कधी विचार येतो .. का कुणास इतके प्रेम करावे ... का कुणाच्या वाटेवरती मन स्वतःचे घुटमळूनि द्यावे - संकेत

जे नसत तेच हव असत...

जे नसत तेच हव असत जे हव असत तेच मिळत नसत मिळून सुद्धा काही गोष्टींच अपुरेपण जाणत असत - संकेत २४ नोव्हेंबर २०१२

नाही आवडत तिला त्रास देणं...

इमेज
नाही आवडत तिला त्रास देणं तरीही त्रास मी देऊन जातो तिच्या रोषाचा (रागाचा) मग मी एक कारण होवून जातो . हळ हळत मन तेंव्हा हृदय हि थर थरत उगाच बोलून गेलो आपण म्हणून मन माझ मुरतं शिक्षा होते तेंव्हा जेंव्हा ती मजवर रागावते घायाळ होत मन माझं जेव्हा चूक माझ्या कडून अशी घडते काय करू , काय बोलू तेंव्हा काहीच सुचेनास होत मौनबद्ध त्या क्षणी नकळत ''sorry'' निघून जात होत हे असंच नेहमी म्हणून ती हि वैतागते किती त्या चुका माझ्या तरीही नेहमीच मला माफ केले जाते . आहे हे नातं अस अमूच प्रेमळ मनाच हृदयाशी हृदयाचं धड धड त्या स्पंदनाच मोकळ्या श्वासेच मना मनाच मायेच , प्रेमाच एका अतूट बंधनाच संकेत य पाटेकर २९.११.२०१२ गुरुवार वेळ : ५ सायंकाळ

मन म्हणत एकाकी ....

मन म्हणत एकाकी का झुराव कुणासाठी , ज्याच्या मनातच नाही प्रेम नि आपुलकी आपल्यासाठी त्यांस का म्हणून द्यावी चावी अपुल्या मनाची मन म्हणत एकाकी नको न मिळोत प्रेम नि आपुलकी करावे भरभरून प्रेम फक्त आपण का नि का मागावे उगा काही कुणापाशी - संकेत ०७.१२.१२

वाटतं कधी एका क्षणी ....

इमेज
आज सकाळच 'दि'(बहिण ) शी बोलता बोलता तिच्या प्रेमळ अन काळजीवाहू शब्दाने मला माझ्या बालपणात लोटले , आईच ते वात्सल्यरूपी प्रेम , तिचं ते प्रेमाने भरविलेला एक एक घास , तिच्या उबदार कुशीतला तो मऊपणा , सारे नजरेसमोर येऊ लागलं . वाटल कि पुन्हा ते क्षण यावेत , पुन्हा आपण लहान ह्वावं, तिच्या अवती भोवती बागडाव , खेळावं .......अस वाटू लागल .... नि काही शब्द सुचले ते असे .... वाटतं कधी एका क्षणी पुन्हा लहान ह्वावं, लहान होता हळू हळू मग मोठं ह्वावं ह्वावं तान्हुल बाळ तिचं, कडेवर उचलुनी तिन घ्यावं, इप्सिताच्या गोष्टी करिता , एक एक घास तिन भरवावं, चिवू आली , काऊ आला , अस हळूच तिने म्हणाव , नजरेला नजर भिडवत अचानक , मागे वळून पाहावं दूर होताच नजरेसमोरून मोठ्या मोठ्या ने रडावं , जवळ घेताच ओठावरले स्मित हास्य उघडावं हसावं , हसून रुसाव , अस नित्य क्रम ह्वावं तिच्या संगतीतला एक एक क्षण खेळत बागडत जावं वाटतं कधी एका क्षणी पुन्हा लहान ह्वावं, तिच्या उबदार मायेच्या कुशीत आपण निवांत नि गाढ झोपी जावं वाटतं कधी एका क्षणी पुन्हा लहान ह्वावं................ संकेत य पाटेक

खरचं म्हणायला किती सोपं असत न्हाई ..

इमेज
काल एका क्षणी मन विचलित झालं, दुभंगल (होत असं अधे मध्ये ) नि रस्त्याने चालता चालता काही ओळी सुचल्या .............. म्हणायला खरचं किती सोपं असत ''निस्वार्थ'' प्रेम असाव, मन मात्र म्हणत एकाकी , निस्वर्थात '' नि '' मुळीच नसाव ( इथे आपल्या मनाचा स्वार्थ येतो ) काय म्हणावं , काय म्हणाव त्याला ( मनाला ) हृदय अशाने हुरहुरतं ( कापत, थरथरत ) मना मनाच्या द्वंद्व युद्धात , ( तीच मन , माझं मन ) ते बिचारं, अधिक जोराने धडधडतं शेवटी होतो एकदाचा कल्लोळ नि फुटतो बांध मनाचा बेभान होतात स्पंदनं नि रंगच बदलतो प्रेमाचा (अशाने प्रेमा बद्दलचे नि त्या व्यक्तीबद्दल आपले विचार बदलू लागतात ) खरचं म्हणायला किती सोपं असत न्हाई ''निस्वार्थ'' प्रेम असाव.......... संकेत य पाटेकर ०३.१२.१२

जे इतरांना मिळत नाही .....

जे इतरांना मिळत नाही , ते मला सहज मिळून जातं, तरी सुद्धा हे मन माझं, दुखाचच गुणगान गातं - संकेत ०५.१२.१२