पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शब्द शब्द हे...........

शब्द शब्द हे हसवतात शब्द शब्द हे रुसवतात शब्द शब्दांमध्ये कधी स्वतहा हि अडकतात - संकेत १२ ऑक्टोबर २०१२

आठवणीच्या असंख्य........गर्दीत

इमेज
आठवणीच्या असंख्य गर्दीत तुझी ठळक आठवण आहे हृदयाच्या कुपीत त्या अनमोल क्षणांची साठवण आहे गोड सोनेरी क्षणांची ती एक नाजूक साजूक मैफिल आहे प्रेमाच्या रंगीत छायेची चित्रफित ती अपुली आहे आठवणीच्या असंख्य गर्दीत तुझी ठळक आठवण आहे ......... संकेत य पाटेकर १७.०९.२०१२

नाही झेपत गर्दी ..........

इमेज
पुरता वैतागलो आता हि नाही झेपत गर्दी सकाळ असो वा रात्र , ट्रेन ला असतेच नेहमीच गर्दी झाले हाडे ठिसूळ आता मन हि आता मरगळले नको नको तो प्रवास आता त्या गर्दीने मन ढासळले जातो वाया वेळ कितीहा एक एक लोकल सोडूनी गर्दी नामक गर्दी ती होते कुठे कमी ती नाईलाज असतो शेवटी गर्दीतूनच जावे लागते ठाणे - अंधेरी प्रवास हा मोठा लोकल ट्रेननेच करावे लागते थकले भागले मन हे आता हि नाही झेपत गर्दी बघावीच लागेल आता कुठे जवळपासच नवी चांगली नोकरी पुरता वैतागलो आता हि नाही झेपत गर्दी सकाळ असो वा रात्र , ट्रेनला असतेच नेहमीच गर्दी - संकेत य पाटेकर १९ ऑक्टोबर २०१२

आनंदाच्या क्षणी........

आनंदाच्या क्षणी दुख सारे पळून जातात , दुखाचे क्षण मात्र आनंद हिरावून घेतात . जीवनाचे रंग हे असेच बदलत राहतात कधी सुख कधी दुख क्रमा क्रमाने येतंच राहतात - संकेत २५.१०.२०१२