धनुष्यातील बाण जसा
सर्रकन सोडावा ना
तसे तिचे शब्द
वाऱ्या वेगाने माझ्या
काळजावर येऊन धडकले
अन हृदयाला माझ्या
तीक्ष्ण धारेने छेद करून गेले
क्षणभर विव्हळलो मी
त्या शाब्दिक घावेने
वेदना झाल्या
अपार त्या शब्दाने
बोलता बोलता बोलून गेली
ती खूप काही
जे तिच्या मनाला
अजिबात पटलं नाही
कारण हि तसंच होतं म्हणा
जीवनातल्या पटावर
माघार मी घेत होतो
इकडून तिकडे नुसताच
आपला पळ मी काढत होतो
चुकीच्या ठिकाणी
चुकीचंच वागत होतो
चूक काय आहे ?
हे माहित असून
गप्प मी बसत होतो.
पटणार तरी कसं तिला
माझं असं वागणं
चूक अन बरोबर काय
हे ज्ञात असून माझं
असं गप्प - गप्प राहाणं
बोलली मग बरंच काही ती
जे अगदी योग्य होतं
माझ्या अशा वागण्याला
असंच काही हवं होतं
एक एक शब्द तिचा
काळजाला भिडत होता
जीवन कसं जगावं
हा धडाच जणू मला
मिळत होता
जीवन कस जगावं
हा धडाच जणू मला
मिळत होता !!
संकेत य पाटेकर
२३.१२.११
वेळ: दुपारी १२:३० मिनिट
वार : शुक्रवार
कविता ह्या समजायच्याच नसतात ............समजायच्या असतात त्या भावना !!
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
'आपलेपणचा हुंदका' तेवढा सहज निघतो रे ...
सहजह 'आठवण' यावी असं काही नसतं रे 'आपलेपणचा हुंदका' तेवढा सहज निघतो रे ...! विसरत नाही बघ तसं कुणी कुणालाच असे 'हृद...
-
माझ्या दोन प्रेमळ बहिणीसाठी हि खास कविता... तू माझी बहिण मी तुझा भाऊ प्रेमाचं हे नातं असंच अतूट ठेवू !! नको कसला स्वार्थ त्यात ...
-
निसर्गाच्या सानिध्यात किती छान वाटत, सोबत कुणी नसल तरी , कुणी असल्यासारखाच वाटत, माघारी पावलांना खरच थांबावेस वाटत , निसर्ग निसर्ग हा...
-
! सह्याद्री ! नभा नभातुनी , दऱ्या खोऱ्यांतुनी गर्जितो माझा सह्याद्री ! दिशा दिशांना साद घालूनी पुलकित होतो सह्याद्री ! गड किल्ल्...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा