सोमवार, १२ मे, २०१४

प्रेम...,

' प्रेम ' हि अशी गोष्ट आहे ,
जी मागूनही कधी मिळत नाही .
ना जबरदस्तीने कुणाकडून कधी
हिसकावून हि घेता येत नाही .

अन ना कधी पैशाने विकत घेता येत
ना हि कधी ते कर्जाने मिळावे म्हणून
एखादी वस्तू गहाण ठेवता येत.

ते मिळतं ते फक्त आपलेपणातून
आपलेपणाच्या आंतरिक ओढीतून
मनातल्या निरागस इच्छेतून
परिमल शब्दातून ,
हृदयाच्या काळजीवाहू स्पंदनातून
मोकळ्या श्वासातून ,
अलगद कोमल स्पर्शातून
अन न तुटनारया अश्या अतूट विश्वासातून ..

प्रेम प्रेम अन प्रेम
हवं असतं तेंव्हा मागूनही मिळत नाही
अन न मागताच मिळत तेंव्हा आनंदाला
सीमाच उरत नाही .

संकेत उर्फ संकु
११.०५.२०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

'आपलेपणचा हुंदका' तेवढा सहज निघतो रे ...

सहजह 'आठवण' यावी असं काही नसतं रे 'आपलेपणचा हुंदका' तेवढा सहज निघतो रे ...! विसरत नाही बघ तसं कुणी कुणालाच असे 'हृद...