बुधवार, १९ जून, २०१३

मुंबई - पुणे- मुंबई


मुंबई - पुणे- मुंबई सारखीच
माझी स्टोरी घडावी
हाती कागदी तुकडा घेऊन
पत्ता शोधीत घरी ती यावी !

असता घरा बाहेर मी
नजर भेट तिची व्हावी
पत्ता विचारून मला
घर शोधावा ती निघून जावी !

न भेटाव घर तिला
फिरून माघारी ती यावी
भेट तिची अन माझी
पुन्हा योगायोगानेच घडावी !

बोलावी चार क्षण
अन क्षणात मैत्री व्हावी
बोलता बोलता मामलेदाराची
चविष्ट मिसळ तिजसंगे खावी !

फिरावं अस काय आहे रे ,
तुमच्या ठाण्यात ?
नाक मुरडतच तिने म्हणावं
उत्तर म्हणून ,
काय नाही आमुच्या ठाण्यात?
अस अभिमानाने मी बोलाव !

घेऊन जाता तिला
तलावपाळी फिरवावी
रांगेत उभे राहून एकदा
बोटिंग करून घ्यावी

कोपिनेश्वर मंदिर कुठेय ?
कानी अलगद तिने म्हणावं
देवळात जाउन तिज सोबत
देव दर्शन करून घ्याव !

मार्केट मधील दुकानामधून
तिला विंडो शोप्पिंग घडवावी
काय हवे नको ह्याची
विचारपूस मी करावी .

शेवटी शेवटी मात्र
मी तिला प्रपोज करावं
घराचा पत्ता शोधत होतीस
तो मीच अस सांगाव .

हा बघ इथे उभा आहे
लग्न करशील माझ्याशी ?
लाजता लाजता तिने
हळूच मान डोलावी !

मुंबई - पुणे- मुंबई सारखीच
अशी माझी स्टोरी घडावी
पुणे वाली ना सही मालवणी
बायको मिळावी ............. :):

संकेत पाटेकर

बुधवार, २७ मार्च, २०१३

आयुष्य म्हणजे



आयुष्य म्हणजे जणू एक पत्र पेटी
भली मोठी
आपल्या अनमोल क्षणांना
आठवणी स्वरूपात पत्रात गुंडाळून
आपल्यात सामावून
घेणारी.
अन नकळत त्या पत्रातील
मधुर अक्षरे कधीतरी ह्या
उनाड वाऱ्यासोबत दूरवर
उधळणारी

- संकेत
२८.०८.२०१२

शुक्रवार, १ मार्च, २०१३

शांत वळणावरल्या त्या वाटेवरती...


शांत वळणावरल्या त्या वाटेवरती
गाडी तिच्या वेगात धावत होती
झाडे झुडपे , घरटी , इमारती
सारी कशी झप झप
मागे पळत सुटली होती

मी आपला तसाच उभा
दाराशी ,
एकटक त्या उंबरठ्याशी
वाऱ्याशी सलगी करत ,
स्वताहाच मन हरवत
काही शब्द मनाशीच पुटपुटत ,
वेगळ्याच विश्वात रमलो होतो ,

आजचा प्रेमाचा दिवस ..valentine day
प्रेमाचा हा दिवस खरा
पण कुणीच नाही म्हणून
क्षणात मिसळून गेलो होतो

कोण असेल , कशी दिसत असेल ,
बोलकी असेल , कि
शांत शांत राहणारी असेल ,
मनापासून प्रेम करणारी असेल ,
कि मनाला प्रेमापासून
दूर ठेवणारी असेल

कशी असेल ती .........कधी भेटेल ती .....
ह्यातच गढून गेलो होतो .....

शांत वळणावरल्या त्या वाटेवरती ......
तिच्या भाव विश्वात मी हरवून गेलो होतो ....

संकेत पाटेकर
१५ फेब्रुवारी २०१३

नात्यांच्या ह्या रेशीम गाठी ...


मनासारखी अवघड गोष्ट नाही ,
नाही आपल्या ताब्यात ठेवता येत
नाही त्यास जेरबंद करता येत
नसतो त्याला कसला रंग नि गंध
नसतो कसला आकार, उकार
पण तरीही त्याच अस्तित्व असत.
आणि म्हणूनच आपल्या सभोवतालच परिसर
नेहमी सुख- दुखात बरसत असत

एखाद्याच 'मन' राखणं ते जपणं तेही आपलं स्वतःच मन सांभाळून , फारच कठीण ...असतं
कारण आयुष्यात बरे वाईट अपघात हे होतच असतात त्या त्या ठराविक वेळेस ..त्या त्या क्षणी
आणि त्या नुसार आपल्या मनाचे धागे हि बदलत राहतात ,
आणि अशा परिस्थितीत हि आपल्या सोबत इतरांचं मन संभाळण हे फारच कठीण होवून जातं ...........
काही वेळेस अशाने इतर ''मन '' हि दुखावली जातात , रुसली जातात .........आणि त्या रुसव्या मनास पुन्हा हसवण हे आपल कर्तव्यच... ते करावच लागतं ..काही वेळा ते अवघड असत , काही वेळा सोपं..

आपलं मन जरी एक असलं तरी ....नाती अनेक असल्यामुळे ...
नात्यानं सोबत त्या त्या व्यक्तीच्या मनाचा विचार करन , त्याला जपन हि भाग पडत
जीवन हे नात्यांच्या अनेक रेशमी गाठींनी बांधलेलं असत , आणि ती रेशमी गाठ जशीच्या तशी भक्कम ठेवायची असेल तर .....इतरांच्या मनाचा विचार करावाच लागतो .
नात्यन शिवाय जीवन नाही...आणि मना शिवाय माणूस नाही ..

एक व्यक्ती
अनेक नाती
नात्यांच्या ह्या
रेशीम गाठी ..........................

नातं तुझं माझं
मनातले काही

संकेत य पाटेकर
१६.०३.२०१३


प्रत्येक शब्दाने
मनावर जखम
होतेच असे नाही
झालेली जखम
भरून येतेच
असे नाही ..............!

शब्द खूप असर
करून जातात
एखाद्या मनावर
पण मनाचे भाव
कुणाला कळतेच
असे नाही ..............!

न कळणारे ,
कळून हि न कळणारे
असतात आपलेच
परंतु त्यांच्या हि
मनाची स्थिती
समजून घ्यायला
कुणी असतेच असे नाही !

संकेत पाटेकर
२०.०२.२०१३

मंगळवार, १८ डिसेंबर, २०१२

! सह्याद्री !


! सह्याद्री !
नभा नभातुनी ,
दऱ्या खोऱ्यांतुनी
गर्जितो माझा सह्याद्री !

दिशा दिशांना
साद घालूनी
पुलकित होतो सह्याद्री !

गड किल्ल्यांच्या
रत्नमनी शोभितो
शान आपुला सह्याद्री !

शिवरायांचे , पराक्रमांचे
गुणगान गातो हा
सह्याद्री !

मनी उभरतो,
उरी फडकतो ,
शक्तिस्थळ अपुला
सह्याद्री !

मना मनातुनी
नाद घुमते
शान आपुला सह्याद्री !

कणखर ,रौद्र
भीषण रुप त्याचे
गौरवशाली सह्याद्री !

महाराष्ट्राचा मुकुट
मनी तो ,
वेड आपुले सह्याद्री !


संकेत य पाटेकर
१८.१२.१२
मंगळवार
वेळ दुपार : २:१५

सोमवार, १७ डिसेंबर, २०१२

नशिबातच जे प्रेम नाही..


नशिबातच जे प्रेम नाही
त्या प्रेमासाठी धडपडतो
मनातल्या भावनांना
सतत मी छळतो ........
- - संकेत

'आपलेपणचा हुंदका' तेवढा सहज निघतो रे ...

सहजह 'आठवण' यावी असं काही नसतं रे 'आपलेपणचा हुंदका' तेवढा सहज निघतो रे ...! विसरत नाही बघ तसं कुणी कुणालाच असे 'हृद...