मंगळवार, २४ डिसेंबर, २०१३

जीवनातले हर एक रंग अनुभवता आले पाहिजे .


जीवनातले हर एक रंग अनुभवता आले पाहिजे .
हसता हसविता आले पाहिजे .
थोडे रुसता आले पाहिजे
रागविता आले पाहिजे

थेंबे थेंबे अश्रू ओघळता आले पाहिजे .
मनाचे धागे जुळविता आले पाहिजे
थोडा खट्याळपण ,
थोडे मस्तीत जगता आल्रे पाहिजे .

कधी एकांतात, कधी गोड आठवणीत ,
मग्न होता आले पाहिजे .
प्रेमाचे नाते जपता आले पाहिजे
प्रेमाने हे जीवन जगता आले पाहिजे .

सुख दुखाचे मोल ठरवता आले पाहिजे .
अनुभवाचे नवे धडे गिरविता आले पाहिजे
विवध रंगातुनी हे जीवन फुलविता आले पाहिजे .
जीवनातले हर एक रंग अनुभवता आले पाहिजे .

------------------------------------------------------

निसर्गाशी एकरूप होता आले पाहिजे
निसर्गाच्या सान्निध्यात वाहता आले पाहिजे
निसर्गातुनी विवध गुण घेता आले पहिजे
आनंदाचे हर एक क्षण अनुभवता आले पाहिजे

हसता हसता हे जीवन जगता आले पाहिजे
जीवनातले हर एक रंग अनुभवता आले पाहिजे .

असंच लिहिता लिहिता...

भावना मनातल्या
कविता माझ्या !

संकेत य पाटेकर
२४.१२.२०१३

गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०१३

सहज सुंदर हास्य तुझे


सहज सुंदर हास्य तुझे
सहज सुंदर बोल
सहज सुंदर रुप असे
कि मनास करती गोड
- संकेत

चला मित्रांनो आपण थोडं हसू ..!!



कुणास ठाऊक
आज आहोत उद्या आपण नसू
चला मित्रांनो आपण थोडं हसू ..!!

चला कुठे भेटू
गप्पात दंग नाचू
चला मित्रांनो आपण थोडं हसू ..!!

कुणास ठाऊक
आज आहोत उद्या आपण नसू
चला मित्रांनो आपण थोडं हसू ..!!

हसू स्वतहा अन
आसू इतर पुसू
चला मित्रहो जीवनहास्य आता शिकू !!

कुणास ठाऊक ,
आज आहोत उद्या आपण नसू
चला मित्रांनो आपण थोडं हसू ..!!

संकेत पाटेकर
०१.१०.२०१३
भावना मनातल्या कविता माझ्या !!

राहिल्या त्या फक्त आठवणी ..


हरवली ती वाट
हरवली दिशा
हरवले जे होते माझे काही !!

हरवले ते बोल
हरवले ते शब्द
हरवला संवाद ज्यात होते प्रेम काही !!

हरवले ते क्षण
हरवले ते मन
हरवला त्या क्षणाचा सुगंध काही !!

हरवले ती भेट
हरवली ती बैठक
हरवले ती एकजूट ज्यात ना उरले काही !!

राहिल्या त्या फक्त आठवणी

- संकेत पाटेकर
२५.०९.२०१३


भावना मनातल्या
कविता माझ्या ..!!

शनिवार, १७ ऑगस्ट, २०१३

आसू हि तू...हसू हि तू


आसू हि तू ,
हसू हि तू
प्रेमाची परिभाषा हि तू ...!!

श्वास तू
श्वासात तू
हृदयाची धडधड तू ...!!

फुल हि तू
कळी हि तू
दरवळता सुगंध हि तू

मन हि तू
मनात तू
मनातले विचार हि तू

जीवन तू ..
जीवनात तू
जगण्याची नवी उमेद तू ...!!

मी हि कविता रचले खरी ..पण काही शब्द (आसू हि तू ,
हसू हि तू) कुठेतरी ऐकल्या सारखी तुम्हाला नक्कीच वाटेल :)
- संकेत पाटेकर
१७.०८.२०१३

बुधवार, १९ जून, २०१३

मुंबई - पुणे- मुंबई


मुंबई - पुणे- मुंबई सारखीच
माझी स्टोरी घडावी
हाती कागदी तुकडा घेऊन
पत्ता शोधीत घरी ती यावी !

असता घरा बाहेर मी
नजर भेट तिची व्हावी
पत्ता विचारून मला
घर शोधावा ती निघून जावी !

न भेटाव घर तिला
फिरून माघारी ती यावी
भेट तिची अन माझी
पुन्हा योगायोगानेच घडावी !

बोलावी चार क्षण
अन क्षणात मैत्री व्हावी
बोलता बोलता मामलेदाराची
चविष्ट मिसळ तिजसंगे खावी !

फिरावं अस काय आहे रे ,
तुमच्या ठाण्यात ?
नाक मुरडतच तिने म्हणावं
उत्तर म्हणून ,
काय नाही आमुच्या ठाण्यात?
अस अभिमानाने मी बोलाव !

घेऊन जाता तिला
तलावपाळी फिरवावी
रांगेत उभे राहून एकदा
बोटिंग करून घ्यावी

कोपिनेश्वर मंदिर कुठेय ?
कानी अलगद तिने म्हणावं
देवळात जाउन तिज सोबत
देव दर्शन करून घ्याव !

मार्केट मधील दुकानामधून
तिला विंडो शोप्पिंग घडवावी
काय हवे नको ह्याची
विचारपूस मी करावी .

शेवटी शेवटी मात्र
मी तिला प्रपोज करावं
घराचा पत्ता शोधत होतीस
तो मीच अस सांगाव .

हा बघ इथे उभा आहे
लग्न करशील माझ्याशी ?
लाजता लाजता तिने
हळूच मान डोलावी !

मुंबई - पुणे- मुंबई सारखीच
अशी माझी स्टोरी घडावी
पुणे वाली ना सही मालवणी
बायको मिळावी ............. :):

संकेत पाटेकर

बुधवार, २७ मार्च, २०१३

आयुष्य म्हणजे



आयुष्य म्हणजे जणू एक पत्र पेटी
भली मोठी
आपल्या अनमोल क्षणांना
आठवणी स्वरूपात पत्रात गुंडाळून
आपल्यात सामावून
घेणारी.
अन नकळत त्या पत्रातील
मधुर अक्षरे कधीतरी ह्या
उनाड वाऱ्यासोबत दूरवर
उधळणारी

- संकेत
२८.०८.२०१२

'आपलेपणचा हुंदका' तेवढा सहज निघतो रे ...

सहजह 'आठवण' यावी असं काही नसतं रे 'आपलेपणचा हुंदका' तेवढा सहज निघतो रे ...! विसरत नाही बघ तसं कुणी कुणालाच असे 'हृद...