बुधवार, २१ डिसेंबर, २०११

''बहिण -भाऊ''


माझ्या दोन प्रेमळ बहिणीसाठी हि खास कविता...


तू माझी बहिण
मी तुझा भाऊ
प्रेमाचं हे नातं
असंच अतूट ठेवू !!

नको कसला स्वार्थ त्यात
नको जराही राग
प्रेमाच्या ह्या बंधनात
असू दे प्रेमाचीच बात !!


असो थोडा रुसवा
असावा जरा धाक ,
प्रेमाच्या ह्या बंधनात
सोडू नको कधी साथ !!

तू माझी बहिण
मी तुझा भाऊ
प्रेमाचं हे नातं
असंच अतूट ठेवू !!

दु:ख तुझे सारे
मजपाशी येवो
सु:खाने आनंदाने
तुझे जीवन सरो !!

तुझी माया तुझं प्रेम
निरंतर असं राहो
प्रेमाचं हे नातं
असंच दृढ होवो !!

तू माझी बहिण
मी तुझा भाऊ
प्रेमाचं हे नातं
असंच अतूट ठेवू !!

संकेत य. पाटेकर
२०.१२.२०११
वेळ : दुपार ३:३०

हि ईमेज नेट वरून घेतली आहे

७ टिप्पण्या:

'आपलेपणचा हुंदका' तेवढा सहज निघतो रे ...

सहजह 'आठवण' यावी असं काही नसतं रे 'आपलेपणचा हुंदका' तेवढा सहज निघतो रे ...! विसरत नाही बघ तसं कुणी कुणालाच असे 'हृद...