वाटतं कधी एका क्षणी
पुन्हा लहान ह्वावं,
लहान होता हळू हळू
मग मोठं ह्वावं
ह्वावं तान्हुल बाळ तिचं,
कडेवर उचलुनी तिन घ्यावं,
इप्सिताच्या गोष्टी करिता ,
एक एक घास तिन भरवावं,
चिवू आली , काऊ आला ,
अस हळूच तिने म्हणाव ,
नजरेला नजर भिडवत अचानक ,
मागे वळून पाहावं
दूर होताच नजरेसमोरून
मोठ्या मोठ्या ने रडावं ,
जवळ घेताच ओठावरले
स्मित हास्य उघडावं
हसावं , हसून रुसाव ,
अस नित्य क्रम ह्वावं
तिच्या संगतीतला एक एक क्षण
खेळत बागडत जावं
वाटतं कधी एका क्षणी
पुन्हा लहान ह्वावं,
तिच्या उबदार मायेच्या कुशीत
आपण निवांत नि गाढ झोपी जावं
वाटतं कधी एका क्षणी
पुन्हा लहान ह्वावं................
संकेत य पाटेकर
०७.१२.१२
शुक्रवार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा