भरभरून प्रेम करणारी
मायेच्या अलगद स्पर्शाने
मनाला जपणारी !
खरचं एक बहिण असावी
भरभरून बोलणारी ,
शब्दांच्या स्वर सागरातून
मन तजेल करणारी
खरचं एक बहिण असावी
नटखटून रंगणारी
रंगाच्या विविधतेतून
हास्य रंग फुलवणारी
खरचं एक बहिण असावी
भरभरून प्रेम करणारी
सख्खी असो व नसो
नेहमीच पाठीशी
ठाम उभी राहणारी !
संकेत य पाटेकर
३० मे २०१३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा