धुंदमुंद पाउस , मन हि वेडेबावरे
वाटे' मुक्त ' होवुनी क्षणात चिंब न्हावे ,
धरली वाट एकट्याची , त्या वाटेवरी स्थिरावे
घेउनि थेंब टपोरे , आसमंत न्याहाळावे !
मेघांचे स्वर गाणे, लहरी गार वारे
सळसळाट पानांचा, मज अंगी भिनावे
पिउनि स्वरगीतं , होवुनी हर्षमुख ,
एक थेंब तो सरींचा ,मिसळूनी त्यात जावे !
गवतांच्या पात्यातुनी , मोत्यांची माळ वाहे ,
शेतात बांध जलाचा , खळखळाटुनि पहा वाहे ,
इवल्याश्या पाखरांची , ती नौका इवली तरंगे ,
खेळ तो अंतरीचा , मन बाळपनित रंगे !
कौलारू त्या छपरांचा , साज फार मोठा
अंगणात बघा त्या , सड सर पाघोळ्यांचा
मन भरून येई , फुलं झडून जाई ,
वाटेवरी त्या गंध वाहे फुलाचा !
वाटे हि वाट मातीची , वळण घेउनि जावे ,
चिखलातुनि माखुनी , मातीशी बंध जुळावे
उमटूनी ठसे पायांचे , मागे वळूनी पाहे ,
त्या गोड आठवणीना , हळूच ओंजळीत घ्यावे . !
जीवन हे असे हे , एकल्या वाटेचे
जुळुनी स्नेहबंध , पाय वाटे निघावे !
- संकेत पाटेकर
१६.०७.२०१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा