शनिवार, १९ एप्रिल, २०१४

देवा भेटू दे रे एखादी ... मनासारखी


देवा भेटू दे रे एखादी ...................... मनासारखी
लग्न : हा विषयच असा आहे कि एकदा आपण त्या वयाचे झालो कि घरातल्याना प्रश्न पडतो ...
कधी करतोयस रे बाबा लग्न ?
कर एकदाचे लगीन ..
.आम्ही वर पोहोचल्यावर करशील का ???

काय बोलायचं ह्या ह्यांना, आपल्या मनातले हाल ते जाणतच नाही ................
कुणी मनासारखी मिळाल्याशिवाय कस काय करणार लगीन ??
वर ना ना प्रश्न नि समस्या .....................
हुश्श ......................देवा देवा देवा

देवा भेटू दे रे एखादी
नाजूक साजूक गोरी गोरी
नाकात नथनी , नउवारीसाडी
मर्र्हाट मोळी शोभणारी
मराठी भाषिक असणारी
मराठीचा अभिमान बाळगनारी
मराठी अस्मिता जपणारी

गोड गोड हसणारी
गालातल्या गाळात रुसणारी
नटखटपनेत भाळनारी
साधी भोळी अन तितकीच
पेमळ मनाची ,मला शोभणारी

देवा भेटू दे रे एखादी
हृदयाशी संवाद साधणारी
मनातल धन जाणणारी
विचारांच्या भरगर्दीत
मला सामावून घेणारी

नातं जपणारी
मनापासून प्रेम करणारी
सर्वांच हित जपणारी
साधी भोळी तितकीच
स्पष्टवक्तेपणा जाणणारी

देवा भेटू दे रे एखादी
गोड हसरी ....जीवनभर सोबत , साथ देणारी .
भेटू दे लवकर .. :))))))

संकेत य पाटेकर
२४.११.२०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

'आपलेपणचा हुंदका' तेवढा सहज निघतो रे ...

सहजह 'आठवण' यावी असं काही नसतं रे 'आपलेपणचा हुंदका' तेवढा सहज निघतो रे ...! विसरत नाही बघ तसं कुणी कुणालाच असे 'हृद...