तिच्या प्रेमभरल्या एका स्वराने
मनात असंख्य ' आनंदी ' वलय निर्माण होतात .
वाटावं बोलतं रहावं अन बोलतं राहावं तिच्याशी
पण आपणच आखलेली हि 'बंधनं' आड येतात .
तरीही हे मन आनंदात बागडतं.
इवल्याश्या त्या क्षणाने का होईना अगदी भरभरून जातं
इतुका क्षण तो ? पण ते हि काही कमी आहे का ?
म्हणून आहे त्यातच समाधानी मानून घेतं.
संकेत य पाटेकर
०६.०५.२०१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा