शनिवार, २७ ऑगस्ट, २०११

!! प्रेमळ अश्रू !!

नजरेला नजर तिच्या देत असता
माझे डोळे अचानक भरून आले
अश्रूरुपी बिंदू ते
गालावरून हळू हळूच
पुढे निघू लागले

माझे ती स्तिती पाहून
डोळ्यातील ते अश्रुबिंदू पाहून
तिचे मन हि गहिरवले
तिच्याही डोळ्यातून मग
माझ्यासाठी अश्रू हे बरसले

दोघेही शांत ,निशब्द असे
उभे होतो बराच वेळ
एकमेकांकडे प्रेमळ नजरेने
पाहत होतो बराच वेळ

काय झाल ? का झाल ?
हे तिला काही कळेनाच
प्रेमाच ते अश्रू तिचे
काही केल्या थांबेनात

प्रेमाच एक खर रूप मला
त्यादिवशी तेंव्हा सापडलं
खर प्रेम आहे तीच
तेंव्हा कुठे मला कळल

रडलो होतो फक्त मी
वाऱ्याच्या त्या झोताने,
डोळ्यात गेलेल्या त्या
बारीक इवल्याश्या
त्या धूळकणाने 

कस सांगाव हे तिला
हे माझाच मला काही कळेना
प्रेमळ तिचे अश्रू हे काही
केल्या रुकेना

मीच पुढाकार घेऊन मग
अश्रू तिचे अलगद पुसले
एकमेकांच्या मिठीत मग
प्रेम आमचे हे फुलले !!

संकेत य पाटेकर
२३.०८.२०११
मंगळवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

'आपलेपणचा हुंदका' तेवढा सहज निघतो रे ...

सहजह 'आठवण' यावी असं काही नसतं रे 'आपलेपणचा हुंदका' तेवढा सहज निघतो रे ...! विसरत नाही बघ तसं कुणी कुणालाच असे 'हृद...