शनिवार, २७ ऑगस्ट, २०११

!! ती रेल्वे !!

रोज सकाळी सायंकाळी
तिच्या येण्याची
मी आतुरतेने वाट पाहत
उभा असतो

ती येताच
आनंदाने , हर्षाने
मोहून मी जात असतो

कधी कधी मला
त्या ठरल्या वेळी
पोहोचताच येत नाही
वेळेची बंधन असणारी ती
मग माझ्यासाठी
मुळीच थांबत नाही

मन कटूटू (kattu) होते अशा वेळी
तिच्या अशा जाण्याने
दिवसभराचे गणितच चुकते
तिच्या अश्या वागण्याने

असो काहीही असो
तिचा सहवास मला
खूप आवडतो
तिच्या त्या सहवासातच
मला जीवनाचा खरा
अर्थ सापडतो

अशी ती
सर्वांचीच

हो हो
सर्वांचीच

लाडकी असो व नसो
मुंबईची जीवनवाहिनी
ट्रेन ..रेल्वे

संकेत य पाटेकर
दि ०४.०७.२०११

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

'आपलेपणचा हुंदका' तेवढा सहज निघतो रे ...

सहजह 'आठवण' यावी असं काही नसतं रे 'आपलेपणचा हुंदका' तेवढा सहज निघतो रे ...! विसरत नाही बघ तसं कुणी कुणालाच असे 'हृद...