शनिवार, २७ ऑगस्ट, २०११

!! तू जवळ असलीस कि !!

तू जवळ असलीस कि ,
मन कस फुलत
आसपासचं वातावरण
कस आनंदमय होत

तू जवळ असलीस कि
मन उंच उंच उडतं
निळ्याशार आकाशात
मनमुराद फिरत

तू जवळ असलीस कि
मन दिलखुलास बोलत
शब्दांच गाठोड मग
आपोआप खुलत 

तू जवळ असलीस कि
मन स्वप्नी रंगत
रंगुनी स्वप्न सार
जीवन हे फुलवत

तू जवळ असलीस कि
मन हे दूर जात
इकडून तिकडे फिरत फिरत
तुझ्याजवळच येवून बसत

तू जवळ असलीस कि
मन हसत-खेळत राहत
एकटक नजेरेने तुझ्याकडे
सतत पाहत राहत

तू जवळ असलीस कि
मन हळूच मला म्हणत
तिझ्याविना जीवन तुझ
खरच बेरंगी झालं असत

संकेत य पाटेकर
२३.०८.२०११ 
मंगळवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

'आपलेपणचा हुंदका' तेवढा सहज निघतो रे ...

सहजह 'आठवण' यावी असं काही नसतं रे 'आपलेपणचा हुंदका' तेवढा सहज निघतो रे ...! विसरत नाही बघ तसं कुणी कुणालाच असे 'हृद...