शनिवार, २७ ऑगस्ट, २०११

भांडण

भांडण हा शब्दच मला
फार भीतीदायक वाटतो
म्हणून मी त्यच्या पासून जरा
दूर वरच राहतो

का भांडतात लोक ?
का दुख ओढावून घेतात लोक ?
शुल्लक कारणावरून हि भांडण ?
विश्वासाला तडा गेल्यावरही भांडण
घरी भांडण, बाहेर भांडण ,
ट्रेन मध्ये भांडण , बस मध्ये भांडण ,
जिकडे तिकडे भांडण अन भांडण

का भांडायचं ? कशाला भांडायचं ?
क्षणाच जीवन आहे हे,
क्षणात नाहीस होऊ शकत
आज इथे आपण आहोत , उद्या नसूही शकतो

प्रेमाचे दोन चार शब्द मनाला
ताजेतवाने करतात ..
मायेचा स्पर्श जीवन जगायला
शिकवतात ..

भांडून दुखी होण्यापेक्षा
प्रेमाने जगल पाहिजे
प्रेम दिल पाहिजे प्रेम घेतल पाहिजे !!

संकेत य .पाटेकर
०८.०८.२०११

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

'आपलेपणचा हुंदका' तेवढा सहज निघतो रे ...

सहजह 'आठवण' यावी असं काही नसतं रे 'आपलेपणचा हुंदका' तेवढा सहज निघतो रे ...! विसरत नाही बघ तसं कुणी कुणालाच असे 'हृद...