शनिवार, २७ ऑगस्ट, २०११

"मनाची भावना"

इकडून तिकडे फिरता फिरता
एके दिवशी माझ मन
फारच थकल
हळूच शांत पावलाने
मग ते मुकाट्याने
हृदयाजवळ येऊन बसल
थोड हसल ..इकड तिकड पाहिलं
दोन चार शब्द हृदयाशी बोलून
तिथच शांत निजल

स्वप्नी रंगल मग ते
भावनाच्या संगतीत हरवलं ते
प्रीतीच्या धुंधित न्हावून गेल ते
"माझ्याविना तू तुझ्याविना मी"
अशा प्रेमळ संवादात हरवून गेल ते

अशी हि प्रीत बहरत असताना
जवळ एकमेकांच्या ते येत असताना
हृदयाने जोरात घंटानाद केला
मनाच्या त्या स्वप्नांचा
क्षणातच त्याने पार चक्काचूर केला.

मन फार संतापल मग
हृदयाशी वाद घालू लागल ते मग
हृदय बिचारा कापू लागला
धडधड-धडधड करत जोराने स्फुंदू लागला

ती (भावना)आली आहे हे फक्त
त्याला सांगायचं होत
मन अन भावनाशी सुंदर भेट
होताना फक्त त्याला पाहायचं होत.
त्याचं खर प्रेम ते त्याला
स्वताहाच्या हृदयात
सामावून घ्यायचं होत
स्वताहाच्या हृदयात
सामावून घ्यायचं होत !!

संकेत य पाटेकर
१७.०८.२०११

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

'आपलेपणचा हुंदका' तेवढा सहज निघतो रे ...

सहजह 'आठवण' यावी असं काही नसतं रे 'आपलेपणचा हुंदका' तेवढा सहज निघतो रे ...! विसरत नाही बघ तसं कुणी कुणालाच असे 'हृद...