शनिवार, २७ ऑगस्ट, २०११

!! ती माझी प्रेमळ बहिण !!

जीवनाच्या एका सुंदर वाटेवर
वळणदार वळणावर
एक एक पाऊल पुढे टाकत असता
त्या सुंदर, कोमल अन प्रेमळ मनाशी
त्या व्यक्तीची माझी भेट झाली !!

जणू ईश्वराने त्याची सारी शक्ती
सारं वैभव,सारं प्रेम
माझ्याकडे अलगद सुपूर्त केलं
जीवनभरासाठी !!

किती सुंदर, गोड अन बोलका स्वभाव,
प्रेमळ ते शब्द , हवी हवीशी वाटणारी
तिची प्रेमळ साद, तिचा तो हसरा चेहरा
माझ्या वेदना - चिंतांना क्षणात दूर करतं
चेहऱ्यावरचा प्रसन्नपणा,टवटवीतपणा
पुन्हा बहरून आणतं !!

आठवतंय अजूनही, आजही
लहानपणी माझं ते कोवलं मन
आईकडे नेहमी हट्टच धरायचं
सख्खी अशी बहिण नाही
म्हणून मुसुमुसु रडत बसायचं !!

मग ती हि म्हणायची
थोडी समजूत माझी काढायची
एक सुंदर गोंडस बहिण
तुझ्यासाठी, बरं का !
हॉस्पिटळातून आपण
नक्कीच आणायची !!

मी हि त्या बोलण्याने
अगदी आनंदून जायचो
खेळत-बागडतचं तसाच
बाहेर पळत सुटायचो !!

आज उरल्या त्या फक्त आठवणी
आणि फक्त आठवणीच
सख्या बहिणीचं प्रेम काही मिळालंच न्हवतं
आता आईच प्रेम हि हिरावून गेलं !!

अशातच असा एकाकीपणात
आपलंसं कुणीतरी असल्यासारखं
भरभरून मायेन प्रेम करणार
प्रेमळ नावाने संबोधनार
काळजी करणार काळजी घेणारं
त्या व्यक्तीच, माझ्या बहिणीच
माझ्या जीवनात नव्याने आगमन झाल.


हे नातं आमुचं जरी रक्ताचं नसल तरी
मना-मनाचं , हृदया-हृदयाचं
प्रेमाचं नातं आहे हे खर..

त्या प्रेमळ बहिणीला रक्षा बंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या
तिच्या सर्व इच्छा - आकांशा पूर्ण होवोत ..सुख समृद्धीने तीच जीवन भरभरून जावोत.
नेहमी हसत खेळत आनंदित रहा.......!
तुझाच
संकेत पाटेकर (संकु )
११.०८.२०११

३ टिप्पण्या:

'आपलेपणचा हुंदका' तेवढा सहज निघतो रे ...

सहजह 'आठवण' यावी असं काही नसतं रे 'आपलेपणचा हुंदका' तेवढा सहज निघतो रे ...! विसरत नाही बघ तसं कुणी कुणालाच असे 'हृद...